शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Uddhav Thackeray: ...तर मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:59 IST

मी माझ्या राजीनाम्याचे पत्र करून ठेवतो आहे. तुम्ही या आणि माझ्या राजिनाम्याचे पत्र राजभवनात घेऊन जा. मी पत्र घेऊन जाऊ शकत नाही कारण मला कोवीड झाला आहे...

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये थांबले आहेत. आपल्याकडे  एकूण ४६ आमदारांचे समर्थन असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदेंनी परत यावे, असे भावनिक आवाहनही केले होते. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असा प्रस्तावही दिला होता. कालपासून आजपर्यंत राज्यात झालेल्या संपूर्ण राजकीय घडामोडींसंदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ज्यांनी मी नको त्यांनी फक्त मला येऊन सांगावे, मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार, असे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना उद्देशून म्हटले आहे.

ठाकरे म्हणाले, कमलनाथ आणि शरद पवार यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले, आम्ही तुच्या सोबत आहोत. पण माझीच लोक म्हणत असतील तर आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री नकोत, तर मग काय म्हणायचे? बंडखोर आमदारांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, सुरतला जाऊन काय बोलायची गरज होती? इथे बोलायचे. समोरा समोर बोलायचे. मी आजही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मी आज माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हालवतो. कोणताही मोह मला खेचू शखत नाही. पण हे माझ्या समोर येऊन बोलावे.

मी राजभवनात पत्र घेऊन जाऊ शकत नाही कारण... -आज मी माझ्या राजीनाम्याचे पत्र करून ठेवतो आहे. तुम्ही या आणि माझ्या राजिनाम्याचे पत्र राजभवनात घेऊन जा. मी पत्र घेऊन जाऊ शकत नाही कारण मला कोवीड झाला आहे. एवढेच नाही, तर जोवर माझ्यासोबत बाळासाहेबांनी जोडून दिलेले शिव सैनिक आहेत. त्यामुळे मी कोणत्याही संकटांना सामोरे जाण्यास तयार आहे. असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

पदे येत असतात आणि जात असतात पण... -ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे, असे वाटत असेल त्यांनी मला सांगावे. मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पदे सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा. या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. शेवटी पदे येत असतात आणि जात असतात, शेवटी पदावर बसल्यानंतर तुम्ही काय काम करतात. यावर जनतेची जी प्रतिक्रिया येते ती तुमची कमाई असते, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवार