शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

"मी अजित दादांसोबत नाही, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे"; नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 08:49 IST

छगन भुजबळ यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. लोकसभेचं तिकिट नाकारल्याने आणि राज्यसभेवरही न पाठवल्याने छगन भुजबळ हे नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, खरंच असं आहे का? छगन भुजबळ नाराज आहेत का आणि ते पक्षांतर करतील का? त्यावर दस्तुरखुद्द छगन भुजबळांनी उत्तर दिले आहे.

नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना या सर्व अफवा असल्याचे सांगत मी अजितदादांसोबत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, असे म्हटले आहे. "विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. कायमच राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहीन", असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, "मी नाराज आहे, दुसऱ्या नेत्यांना भेटलो आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली, या सगळ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मला जर कुणाला भेटायचं असेल तर मी उघडपणे भेटेन", असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

याचबरोबर, "माझ्या नाराजीच्या चर्चा साफ खोट्या आहेत. मी नाराज नाही. राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजण नाराज होतो अन् दुसऱ्या दिवशी कामाला लागतो. कमी जागा मिळाल्यामुळे राहुल गांधी नाराज असतील, मोदीसाहेबही नाराज असतील. शरद पवारही नाराज असतील.. देवेंद्र फडणवीसही नाराज असतील.. अजित पवारही बारामतीची जागा का गेली, यामुळे नाराज असतील. ज्याप्रमाणे नाराजीनंतर सर्व नेते कामाला लागले, तसेच मीही कामला लागलो आहे. मी नाराज नाही किंवा कुणालाही भेटलो नाही", असेही छगन भुजबळ म्हणाले. 

भुजबळांनी सांगितला सगळा घटनाक्रम १० जून : मी षण्मुखानंद हॉल येथील कार्यक्रमात होतो.११ जून : आमच्या लोकांबरोबर मी होतो१२ जून : अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली होती, त्या बैठकीत उपस्थित होतो.१३ जून : राज्यसभेसाठी अर्ज भरायला विधानसभेत होतो.१४ जून : पुण्यात गेलो होतो, तिथे काही बैठका घेतल्या. फुलेवाड्याच्या कामासाठी पुण्यात होतो.१५ जून : येवल्यात होतो. तेथील हवं तर तेथील पत्रकारांना विचारा.१६ जून : संध्याकाळी मी मुंबईत आलो.

दरम्यान, "मी अजितदादांसोबत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे", असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार