‘पत्रकारांकडून मला नेहमीच प्रोत्साहन’

By Admin | Updated: December 20, 2015 00:49 IST2015-12-20T00:49:47+5:302015-12-20T00:49:47+5:30

मी केलेल्या चांगल्या कामाबद्दल नेहमीच पत्रकारांकडून मला प्रोत्साहन मिळाले, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

'I always encourage journalists' | ‘पत्रकारांकडून मला नेहमीच प्रोत्साहन’

‘पत्रकारांकडून मला नेहमीच प्रोत्साहन’

नागपूर : मी केलेल्या चांगल्या कामाबद्दल नेहमीच पत्रकारांकडून मला प्रोत्साहन मिळाले, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि ट्रस्ट यांच्यावतीने राज्य अधिस्वीकृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल लोकमत मुंबईचे विशेष प्रतिनिधी यदु जोशी आणि ज्येष्ठ महिला संपादक राही भिडे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, ब्रम्हाशंकर त्रिपाठी, शिरीश बोरकर उपस्थित होते.

Web Title: 'I always encourage journalists'