हैदराबाद हाऊस राज्यकारभाराचा केंद्रबिंदू!
By Admin | Updated: October 30, 2014 01:40 IST2014-10-30T01:40:12+5:302014-10-30T01:40:12+5:30
मुख्यमंत्र्यांचे सचिवालय असलेले हैदराबाद हाऊस आजवर फक्त हिवाळी अधिवेशन काळातच प्रशासकीय कामासाठी उपयोगात येत असल्याचे पहायला मिळायचे.
हैदराबाद हाऊस राज्यकारभाराचा केंद्रबिंदू!
नागपूर : मुख्यमंत्र्यांचे सचिवालय असलेले हैदराबाद हाऊस आजवर फक्त हिवाळी अधिवेशन काळातच प्रशासकीय कामासाठी उपयोगात येत असल्याचे पहायला मिळायचे. या काळातच येथे अधिका:यांची वर्दळ असायची. आता मात्र, नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे हैदराबाद हाऊस राज्य कारभाराचा मुख्य केंद्रबिंदू राहील. रामगिरीवरही महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय घेतले जातील. या दृष्टीने या दोन्ही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे साधारणत: शनिवार आणि रविवारी नागपूरला मुक्कामी असतील. मात्र, या काळातही ते राज्यकाराभावर लक्ष ठेवून असतील. यासाठी या दोन्ही ठिकाणी ‘24 बाय 7’ विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तशी तयारी आतापासून सुरू झाली आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवसांपूर्वी सचिवालय नागपुरातील हैदराबाद हाऊसमध्ये दाखल होते. प्रशासकीय फाईल्स येथे आणल्या जातात. रामगिरीवरही मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सुरू होते. प्रशासकीय बैठका, मंत्रिमंडळाची बैठक, शिष्टमंडळांच्या भेटीगाठी येथे होत असत. अधिवेशन संपले की रामगिरी अन् हैदराबाद हाऊस या दोन्ही ठिकाणी प्रशासकीय वर्दळ संपते. मात्र, आता या दोन्ही ठिकाणी पुढील पाच वर्षे नियमितपणो मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सरू राहील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील, अशी माहिती प्रशासकीय सूत्रंनी दिली.
अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांना द्यावयाची निवेदने हैदराबाद हाऊसमध्ये किंवा रामगिरीवरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात स्वीकारली जातात. अधिवेशनानंतर ही सोय नसते. आता या दोन्ही ठिकाणी कायमस्वरुपी कार्यालय राहणार असल्यामुळे नागरिकांना आपले प्रश्न मुख्यमंत्र्यांर्पयत पोहचविण्यासाठी सोय होणार आहे. (प्रतिनिधी)
च्केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महालातील वाडा व संघ मुख्यालय या नंतर आता नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरातील निवासस्थान असलेले ‘276, त्रिकोणी पार्क’ हे एक नवे ‘पॉवर सेंटर’ म्हणून उदयास येणार आहे. फडणवीस यांचे हे घर यापूर्वीही राजकीय हालचालीचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्या काळात प्रमोद महाजन यांच्यासह संघ परिवारातील दिग्गजांनी येथे हजेरी लावली आहे.
च्या घराच्या भिंतींनी राजकीय वर्दळ अनुभवलेली आहे. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या घराला वेगळेच महत्त्व येणार आहे. फडणवीस नागपूर मुक्कामी असताना त्यांच्या या घरी महत्त्वाच्या बैठका होतील, दिग्गज नेते येथे भेटी देतील. या नव्या ‘पॉवर सेंटर’ची सर्वत्र चर्चा असेल यात शंका नाही.