ठाण्यामध्ये धावणार हायब्रिड बस

By Admin | Updated: February 15, 2016 04:16 IST2016-02-15T04:16:52+5:302016-02-15T04:16:52+5:30

स्वीडिश तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात बनविलेल्या पर्यावरणपूरक व्होल्वो हायब्रिड बसचे रविवारी लोकार्पण करण्यात आले.

Hybrid bus running in Thane | ठाण्यामध्ये धावणार हायब्रिड बस

ठाण्यामध्ये धावणार हायब्रिड बस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : आरामदायी प्रवासाबरोबरच इंधनाची बचत

मुंबई : स्वीडिश तंत्रज्ञानाचा वापर  करून भारतात बनविलेल्या पर्यावरणपूरक व्होल्वो हायब्रिड बसचे रविवारी लोकार्पण करण्यात आले.

स्वीडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलात हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आरामदायक आणि पर्यावरणपूरक राहावी यासाठी स्वीडिश तंत्रज्ञानाचा वापर करून या व्होल्वो हायब्रिड बसची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रात ही बस धावणार आहे. नवी मुंबई व ठाणे महापालिका आणि व्होल्वो बस कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार झाला. स्वीडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान यांनी या बसची प्रतीकात्मक चावी मुख्यमंत्र्यांना सुपुर्द केली.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक विस्तारित आणि बळकट करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. प्रदूषणविरहित इंधन सेवा असलेल्या बसेसच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम केले जात आहे.

Web Title: Hybrid bus running in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.