शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ, दिवाळी सुट्ट्यांचा घोळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 06:24 IST

School : दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालयाने १ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टीचा कालावधी जाहीर केला होता.

मुंबई : शिक्षण विभागाने ऐन वेळी दिवाळीच्या सुट्ट्यांच्या तारखांत बदल केल्यामुळे शाळांच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ होणार आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या तारखेनुसार शाळांनी तयार केलेले परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालयाने १ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टीचा कालावधी जाहीर केला होता. त्यानुसार, शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करून, विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे काही शाळांचे ३० ऑक्टोबरपर्यंत सत्र परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. मात्र, नव्याने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या तारखांमुळे या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. 

राज्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिवाळीनिमित्त मूळगावी/परगावी जाण्याचे आरक्षण केले आहे, पण ऐन वेळी सुट्टीच्या तारखांत बदल केल्यास सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे दिवाळी सुट्टीची तारीख बदलू नये, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले. तर शिक्षण विभागाच्या २७ ऑक्टोबरच्या सुट्ट्यांच्या पत्रकाची सक्ती शाळांवर करू नये आणि आधी नियोजित केलेल्या सुट्ट्या कायम ठेवाव्यात, अशी भूमिका शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मांडली.

माध्यमिक शाळा संहितेनुसार सुट्टी देण्याचे अधिकार शाळांना असताना, बुधवारी शिक्षण सहसचिवांनी काढलेले परिपत्रक व शिक्षणमंत्र्यांनी केलेले सुट्ट्यांचे ट्विट नियमबाह्य आहे, असे भाजप शिक्षक आघाडीचे सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले. 

 शिक्षण विभागातील गोंधळ चव्हाट्यावरसुट्ट्यांच्या तारखांत झालेल्या बदलामुळे हा शिक्षण विभागातील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. दीड-दोन वर्षांपासून घरात असलेले पालक व मुलांच्या बाहेर पडण्यासाठी केलेल्या नियोजनात या बदललेल्या निर्णयामुळे अडथळा निर्माण झाला आहे. - सुशील शेजुळे, पालक व मराठी शाळा संस्था चालक संघटना समन्वयक 

नव्या निर्णयामुळे शाळांच्या वेळापत्रकाचे नियोजन यामुळे बिघडणार असून, शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने गोंधळ निर्माण न करता आधीच्या सुट्ट्या कायम ठेवाव्यात. - राजेश पंड्या, उपाध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी.

टॅग्स :SchoolशाळाDiwaliदिवाळी 2021