प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून
By Admin | Updated: October 10, 2016 20:02 IST2016-10-10T20:02:42+5:302016-10-10T20:02:42+5:30
दोघांच्या प्रेमाच्या आड येणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने गळा आवळून खून केल्याची घटना अंढेरा येथे १० आॅक्टोबर रोजी उघडकीस आली.

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून
>ऑनलाइन लोकमत
अंढेरा (बुलडाणा), दि. 10 - दोघांच्या प्रेमाच्या आड येणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने गळा आवळून खून केल्याची घटना अंढेरा येथे १० आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. पोलिसांनी पत्नी व प्रियकराला अटक केली असून, हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा येथील गणेश किसन ढाकने (वय ४०) हे पत्नी अर्चना गणेश ढाकने (वय २५) हिच्यासोबतच वास्तव्यास होते. दरम्यान ९ आॅक्टोबरच्या रात्री अर्चना व तिचा प्रियकर विष्णू नामदेव ढाकने (वय २२) या दोघांनी गणेश ढाकने याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तसेच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दाखविण्यासाठी त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला. १०
आॅक्टोबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतक गणेशचे वडिल किसन पाटीलबा ढाकने (६५ वर्षे) यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून तपासनी केली. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गणेशची गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गणेशची पत्नी अर्चना व विष्णू ढाकने यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर अर्चनाने गणेश त्यांच्या प्रेमात अडसर ठरत असल्याने त्याची हत्या केल्याची कबूली दिली. अर्चना व विष्णू ढाकनेवर ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.