पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: September 23, 2016 21:14 IST2016-09-23T21:14:07+5:302016-09-23T21:14:07+5:30
सासरची मंडळी संपत्तीची वाटणी करून देत नसल्याच्या कारणावरून राहत्या घरी जाळून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला.

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
dir="ltr">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - सासरची मंडळी संपत्तीची वाटणी करून देत नसल्याच्या कारणावरून राहत्या घरी जाळून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. पत्नी मरण पावल्याचे समजताच तिच्या पतीनेही रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात घडली.
सीमा दिनेश लोधी (रा. भोईवाडा, उदय कॉलनी) असे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर तिचा पती दिनेश लोधी (राजपूत) हा सध्या घाटीत उपचार घेत आहे. पोलिसांनी सांगितले की, सीमा आणि दिनेश यांचा दहा ते पंधरा वर्षांपूर्वी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली. सीमाचे माहेर भोईवाडा आहे तर सासर धुळे जिल्ह्यात आहे. सासरची मंडळी तिचा नेहमी छळ करीत असत. शिवाय घरातील संपत्तीची वाटणीही ते करून देत नव्हते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी राजपूत दाम्पत्य भोईवाडा येथे राहण्यास आले. दिनेश एका दुकानात कामाला लागला. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी सासरची मंडळी संपत्तीची वाटणी करून देत नाही म्हणून सीमाने जाळून घेतले होते. खाजगी रुग्णालयात उपचारानंतर तिला घाटीत हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना सीमा शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास मरण पावली. तिच्यासोबत असलेल्या दिनेशला ही बाब समजताच पत्नीच्या विरहाने त्याने घाटी रुग्णालयातील दुसºया मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत दिनेश गंभीर जखमी झाला. त्यास घाटीत दाखल करण्यात आले. याविषयी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल राम तपास करीत आहेत.