अनैतिक संबंधातून पतीचा खून!

By Admin | Updated: June 5, 2016 00:41 IST2016-06-05T00:41:11+5:302016-06-05T00:41:11+5:30

पत्नीला अटक :प्रियकर असलेला तुपेवाडीचा माजी सरपंच फरार

Husband's blood from immoral relations! | अनैतिक संबंधातून पतीचा खून!

अनैतिक संबंधातून पतीचा खून!

वडूज/ कातरखटाव : खटाव तालुक्यातील तुपेवाडी येथे पत्नीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या कारणावरून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कर्मचारी ब्रह्मदेव उत्तम तुपे (वय ३८) यांचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, माजी सरपंच असलेला प्रियकर फरार झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ब्रम्हदेव तुपे हे राहत्या घरात पडलेल्या स्थितीत आढळून आले. घरातील छताच्या अँगलला साडीबरोबरच टेलिफोनच्या वायरीचा तुकडाही लोंबकळताना दिसला.
अंत्यसंस्काराचा विधी पार पडल्यानंतर मृताचा भाऊ सुनील याने संशयित स्वाती व तिचा प्रियकर धनाजी काटकर यांच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला. स्वाती हिला वडूज पोलिसांनी अटक केली असली तरी संशयित मानेवाडी-तुपेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचा माजी सरपंच व वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी संचालक धनाजी शिवाजी काटकर (रा. मानेवाडी) हा प्रियकर फरार आहे. स्वातीच्या जबाबानंतर या घटनेचे रहस्य उलगडेल.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू !
मृताचा भाऊ व इतर मंडळी घरात गेली असता प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा सर्वांना भास झाला. मात्र, आतील सारी परिस्थिती पाहून त्यांना हा खुनाचा प्रकार असल्याची दाट शंका आली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वडूज ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Husband's blood from immoral relations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.