उत्तनमध्ये वृद्धेने केली पैशांसाठी पतीची हत्या

By Admin | Updated: August 25, 2014 03:43 IST2014-08-25T03:43:28+5:302014-08-25T03:43:28+5:30

उत्तन-सागरी पोलिसांच्या हद्दीत २० आॅगस्ट रोजी झालेली ६५ वर्षीय वृद्धाची हत्या त्यांच्याच पत्नीने पैशांच्या लोभापायी केल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी ६० वर्षीय पत्नीला अटक केली आहे.

Husband murders for wealth made in Uttranchal | उत्तनमध्ये वृद्धेने केली पैशांसाठी पतीची हत्या

उत्तनमध्ये वृद्धेने केली पैशांसाठी पतीची हत्या

भार्इंदर : उत्तन-सागरी पोलिसांच्या हद्दीत २० आॅगस्ट रोजी झालेली ६५ वर्षीय वृद्धाची हत्या त्यांच्याच पत्नीने पैशांच्या लोभापायी केल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी ६० वर्षीय पत्नीला अटक केली आहे.
येथील पालखाडी परिसरात रॉकी अंतून नुनीस (६५) हे २० आॅगस्ट रोजी हत्या झाली होती. त्यांची पत्नी जेन्वी (६०) घरी आल्यानंतर हत्येचा प्रकार उजेडात आला होता. जेन्वी यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारच्यांनी धाव घेत उत्तन-सागरी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. पोलिसांना पंचनामा करताना घटनास्थळी तेथे रक्ताने माखलेला कोयता जप्त करून पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये काही संशयितांची कसून चौकशी केली असता रॉकी यांची हत्या त्यांच्याच पत्नीनेच केल्याचे समोर आले. पोलिसांनी जेन्वी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पैशांच्या कारणावरून हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Husband murders for wealth made in Uttranchal