पतीनेच पत्नीला जिवंत जाळले

By Admin | Updated: February 1, 2017 19:22 IST2017-02-01T19:22:58+5:302017-02-01T19:22:58+5:30

एका विवाहित महिलेला तिच्या पतीने जिवंत जाळल्याची अमानवी घटना

The husband burnt his wife alive | पतीनेच पत्नीला जिवंत जाळले

पतीनेच पत्नीला जिवंत जाळले

>ऑनलाइन लोकमत
अकोला,दि. 1 - येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे येथे एका विवाहित महिलेला तिच्या पतीने जिवंत जाळल्याची अमानवी घटना मंगळवारी 31 जानेवारीच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चोहोट्टा बाजार परिसरात खळबळ उडाली.
करतवाडी रेल्वे येथील रहिवासी असलेला आरोपी आकाश ऊर्फ अशोक किरडे वय 40 वर्ष याने आपल्या मंगला (38) नामक पत्नीला आपल्या घरातच दोरीने बांधून जिवंत जाळले.
या घटनेत पूर्णपणे भाजलेल्या मंगलाचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि प्रेत उत्तरीय तपासणीकरिता अकोला येथे पाठविले. मृत मंगलाचे मावसे सुरेश एकीरे यांच्या फिर्यादीवरून दहीहांडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वनारे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दोनकलवार, पोहेकॉं. वाघळकर, इंगळे, ठाकूर करीत आहेत. याप्रकरणी आरोपी आकाश किरडे यास न्यायालयात उभे केले असता, न्यायाधिशांनी त्यास 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: The husband burnt his wife alive