पतीचा चावा घेणारी पत्नी गजाआड...

By Admin | Updated: April 8, 2015 02:37 IST2015-04-08T02:37:32+5:302015-04-08T02:37:32+5:30

पत्नी रूढी-परंपरा न जुमानणारी, स्वच्छंदी आणि पाश्चिमात्य संस्कार अंगीकारलेली, तर पती पूजापाठ, होम-हवनात रममाण होणारा़ प्रेमविवाहानंतर लगेचच दोघांच्या या परस्परविरोधी सवयी समोर आल्या आणि घरात

Husband bites gagaad ... | पतीचा चावा घेणारी पत्नी गजाआड...

पतीचा चावा घेणारी पत्नी गजाआड...

मनीषा म्हात्रे, मुंबई
पत्नी रूढी-परंपरा न जुमानणारी, स्वच्छंदी आणि पाश्चिमात्य संस्कार अंगीकारलेली, तर पती पूजापाठ, होम-हवनात रममाण होणारा़ प्रेमविवाहानंतर लगेचच दोघांच्या या परस्परविरोधी सवयी समोर आल्या आणि घरात द्वंद्व सुरू झाले. काही वर्षे सातत्याने सुरू असलेली बाचाबाची, रुसवे-फुगवे, अबोल्याने हिंसक रूप घेतले. पत्नीने रागाच्या भरात पतीचा करकचून चावा घेतला. पतीने त्याच अवस्थेत मुलुंड पोलीस ठाणे गाठले. या घटनेच्या पाच महिन्यांनंतर मुलुंड पोलिसांनी पत्नी पौर्णिमा मेपाणी (४१) हिला गजाआड करण्यात आले.
गेल्या वर्षी १ नोव्हेंबरला ही घटना मुलुंडच्या वालजी लद्दा रोडवरील उच्चभ्रू सोसायटीत घटना घडली. नयन नेपाणी (४२) असे या प्रकरणातील तक्रारदार पतीचे नाव असून, ते उद्योगपती आहेत. व्यवसायानिमित्त कर्नाटक दौऱ्यावर असताना त्यांची ओळख पौर्णिमाशी झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाह केला. सुरुवातीची काही वर्षे सुरळीत गेली. मात्र हळूहळू दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी, तत्त्वे खटकू लागली. दरम्यान, अपत्यप्राप्तीमुळे तडजोड करून दोघे सोबत राहू लागले. १ नाव्हेंबरला रात्री उशिरा घरी परतलेल्या नयनने यावरून पौर्णिमाशी वाद घातला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि अखेरीस पौर्णिमाने नयनच्या दंडाचा करकचून चावा घेतला. या घटनेनंतर मात्र नयनने पोलीस ठाणे गाठून पौर्णिमाची तक्रार दिली. पोलिसांनी नयनला अग्रवाल रुग्णालयात दाखल करीत पौर्णिमाविरोधात गुन्हा नोंदविला. घरगुती कलह असल्याने पोलिसांनी पौर्णिमाला नोटिसा धाडून चौकशीस हजर राहण्यास अनेकदा बजावले. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही सबब पुढे करून ती टाळू लागली. अखेर मंगळवारी ती हजर झाली. जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आले.

Web Title: Husband bites gagaad ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.