पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 19:47 IST2017-02-21T19:47:47+5:302017-02-21T19:47:47+5:30
पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पतीला शिरपूर पोलिसांनी २० फेब्रुवारीला अटक केली.

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस अटक
ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन (वाशिम), दि. 21 : पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पतीला शिरपूर पोलिसांनी २० फेब्रुवारीला अटक केली. २१ फेब्रुवारीला आरोपीला न्यायालयात हजर केले असता, २३ फेब्रुवारीपर्यंत आरोपीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
३१ डिसेंबर २०१६ रोजी मनिषा किसन अंभोरे या विवाहितेला पती किसन अंभोरे याने अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिले होते. जळालेल्या स्थितीत मनिषा अंभोरे हिला उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरु असतांना १३ जानेवारी २०१७ रोजी मनिषाचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्व जबानीत मनिषाने पती किसन अंभोरे याने मारहाण करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची माहिती दिली होती. मृत्यूपूर्व जबानीवरुन शिरपूर पोलिसांनी १७ फेब्रुवारी रोजी पती किसन अंभोरे विरुध्द भादंवी कलम ३०२, ३२४, ५०६, नुसार गुन्हा दाखल केला. २० फेब्रुवारी रोजी आरोपीस अटक करण्यात आली. मंगळवारी विद्यमान न्यायालयात हजर केले असता, २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.