पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 22:10 IST2017-01-16T22:10:01+5:302017-01-16T22:10:01+5:30

दारूच्या नशेत पत्नीस मारहाण करून तिची हत्या केल्यानंतर संपूर्ण रात्र पत्नीच्या शवाबरोबर काढणाऱ्या पतीस नवापूर पोलिसांनी जेरबंद केले.

Husband arrested on wife's murder | पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस अटक

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस अटक

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार,दि. 16 - दारूच्या नशेत पत्नीस मारहाण करून तिची हत्या केल्यानंतर संपूर्ण रात्र पत्नीच्या शवाबरोबर काढणाऱ्या पतीस नवापूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, शहरातील खाकरफळी भागातील रहिवाशी भुऱ्या राठोड यास दारूचे व्यसन होते. त्याची पहिली पत्नी मयत झाल्याने दोन वर्षांपूर्वी त्याने विमलबाईशी विवाह केला होता. दारुचे व्यसन असल्याने भुऱ्या व विमलबाईचे नेहमी भांडण होत असे. ११ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी पाच वाजेपासून त्यांच्या भांडणास सुरूवात झाली. रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीप्रमाणे शेजाऱ्यांनीही त्यांचे भांडण सोडविले नाही. रात्रीच्या सुमारास भुऱ्याने विमलबाईस लाकडाच्या सहाय्याने मारहाण केली. त्यात ती मरण पावली.

भुऱ्याच्या पुतण्याने दुसऱ्या दिवशी सकाळी भुऱ्याच्या घरी भेट दिली असता विमलबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. मारहाण केल्यानंतर मात्र भुऱ्याने रात्रभर मयत पत्नीसह दुसऱ्या खाटेवर झोपून काढली. मोहन कोकणी यांनी नवापूर पोलिसात या घटनेची फिर्याद दिल्याने भुऱ्या राठोड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा करण्यात आला. पोलीस निरीक्षक रामदास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पो.काँ.दिलीप मोरे, साहेबराव खांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन भुऱ्या राठोड यास अटक केली. (वार्ताहर)

Web Title: Husband arrested on wife's murder