शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

भुकेलेलेच भ्रष्टाचारी असतात!

By admin | Updated: October 14, 2015 04:09 IST

दूरस्थ पद्धतीने मुंबई वा अन्यत्र बसून येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा कारभार चालविणारे या संस्थेचे तूर्तासचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या मते ‘प्रतिष्ठानचे विद्यमान विश्वस्त खाऊन

हेमंत कुलकर्णी, नाशिकदूरस्थ पद्धतीने मुंबई वा अन्यत्र बसून येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा कारभार चालविणारे या संस्थेचे तूर्तासचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या मते ‘प्रतिष्ठानचे विद्यमान विश्वस्त खाऊन पिऊन सुखी असल्यानेच गेल्या पंचवीस वर्षात संस्थेत एक पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही’! त्यांच्या या अजब शोधाचा हास्यास्पद श्लेष म्हणजे जे भुकेले असतात, तेच भ्रष्टाचारी असतात!सामान्यत: साहित्यिक हा एक अत्यंत संवेदनशील, सजग, डोळस आणि नीरक्षीरविवेकाचा धनी मानला जातो. कर्णिक यात मोडत असावेत अशी शंका घ्यायला पुरेपूर वाव आहे आणि ही शंका खरी असेल तर त्यांना समाजातील भुकेला आणि भरपेटला यातील नेमका कोणता वर्ग भ्रष्टाचाराने लिप्त असतो, हेही आकळायला काही हरकत नाही. पण खरा मुद्दा तो नाहीच. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या घटनेपासून तो पुरस्कार योजनेपर्यंतचा सारा तपशील वेळोवेळी दस्तुरखुद्द कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या हस्ताक्षरात तयार झालेला. त्यांनीच प्रतिष्ठानची जी घटना तयार केली त्या घटनेनुसार कोणताही विश्वस्त (खरे तर कार्यकारिणीचा सदस्य) कमाल दहा वर्षांपेक्षा अधिक काळ त्या पदावर राहू शकत नाही, त्याला निवृत्त व्हावेच लागते. आजपर्यंत तसेच होतही आले आहे. जो निवृत्तला त्याच्या जागी अन्य विश्वस्तांनी प्रतिष्ठानच्या सामान्य सदस्यांमधून रिक्त जागी भरावी वा भराव्यात अशीही तरतूद तात्यांनीच करुन ठेवलेली. (खरे तर हे कार्य समस्त सभासदांच्या आम सभेकडे पोचते व्हावयास हवे होते) ज्याअर्थी त्यांनी अत्यंत नि:संदिग्ध शब्दात अशी तरतूद केली त्याअर्थी त्यांचा त्यामागे काही निश्चितच हेतू असणार. नवीन लोकाना संधी दिली तर नव्या कल्पना येतील व प्रतिष्ठानच्या कामाला नवी उभारी येत जाईल, असाच काहीसा हेतू त्यामागे असू शकतो. ‘जुन्यांनी मन:पूत भ्रष्टाचार केला आता नव्यांना संधी देऊ’ असा हेतू खचितच नसणार आणि भ्रष्टाचार करायला आहेच काय तिथे? (असं लोकाना वाटतं. कर्णिकांकडे याबाबत अधिक ज्ञान असू शकते)आजवर पाळली गेलेली प्रथा मोडीत काढून घटनेतील सक्तीच्या निवृत्तीचे कलम रद्द करण्याचा म्हणजेच घटना दुरुस्ती करण्याचा एक संकल्प मधु मंगेश यांच्या पौरोहित्याखाली अलीकडेच सोडण्यात आला असून तो साहजिकच वादग्रस्त ठरला आहे. त्या वादावर बोलतानाच कर्णिकांनी ‘वेळोवेळी घटनेत गरजेनुसार दुरुस्ती व्हावी अशी तात्यांची भूमिका होती (हे तात्यांनी त्यांना कधी सांगितले बरे?) प्रतिष्ठान ही काही सोसायटी नव्हे. त्यामुळे संचालक तीन वर्षांनी बदलावेतच असे नव्हे. कामात सातत्य राहावे म्हणून विश्वस्तांच्या बैठकीत दुरुस्तीचा ठराव मंजूर केला गेला आहे व त्यात बेकायदेशीर असे काही नाही’, असे प्रबोधन करुन ‘ते’ ऐतिहासिक उद्गार काढले आहेत.मुळात कोणत्या विश्वस्तांनी ठराव मंजूर केला? निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्यांनीच ना? म्हणजे एकूण प्रकार साटेलोट्याचा. या प्रतिष्ठानचे आजचे दुर्दैव म्हणजे तात्यासाहेब हयात असताना, त्यांचा सहवास लाभलेले आणि त्यांच्या साहित्यावर जीवापाड प्रेम करणारे व एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही लोक तिथे नाहीत. नाशिककरांनी, नाशिककरांसाठी व नाशिककरिता स्थापन केलेल्या प्रतिष्ठानच्या डोक्यावर बाहेरचा अध्यक्ष बसविण्याचा जो पायंडा खुद्द तात्यांनी सुरु केला तो आजतागायत तसाच सुरु आहे आणि मधु मंगेश त्याच मालिकेतील एक आहेत. त्यांनी सुखेनैव अध्यक्षपद उबवीत रहावे पण ताजमहालला कोण्या गणपा मिस्तरीनी वीट लावण्याचा प्रकार केल्यागत कुसुमाग्रजांनी जे निर्माण करुन ठेवले त्यात उगा मोडतोड न करता आहे ते तसेच अबाधित ठेवावे इतकीच तात्यांवर आजही प्रेम करणाऱ्या तमाम नाशिककरांची आंतरिक इच्छा आहे.