शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २० हजारांपेक्षा जास्त कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ, मातीच्या वस्तू विकण्यासाठी परवानगी द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 19:09 IST

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना साकडे

ठळक मुद्देकारागिरांची उपासमार होण्याची व्यक्त केली भीती राज्यात ग्रामीण भागातील वीट उद्योग चालू करणेसाठी नुकतीच परवानगी

प्रशांत ननवरेबारामती : राज्यात वीट व्यावसायिक सोडून गाडगी मडकी बनविणारे २० हजार एवढी कुंभार कुटुंबे आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागणारे कुंभार माती कलश व उन्हाळी माट , डेरे,रांजण,सुरई विकण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.सणासुदीला लागणाच्या मातीच्या वस्तू तयार करून उदरनिर्वाह करतो. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विक्रीसाठी ग्रामीण कारागीरांवर उपासमार होण्याची भीती अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाचे अध्यक्ष दत्ता कुंंभार यांनी व्यक्त केली. त्यासाठी कुंभार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्र पाठविले आहे. अध्यक्ष कुंभार यांनी व्यावसायिक अडचणीत आल्याचे सांगत विक्री परवानगीसाठी साकडे घातले आहे.राज्यात ग्रामीण भागातील वीट उद्योग चालू करणेसाठी नुकतीच परवानगी मिळाली आहे. त्याबद्दल आम्ही कुंभार ऋणी आहे. राज्यातील कुंभार समाज आपला पारंपरिक वीट व्यवसाय तसेच पारंपरिक गाडगी, मडकी, माठ, रांजण, गणपती, व सणासुदीला लागणाच्या मातीच्या वस्तू तयार करून उदरनिर्वाह करतो.या कारागीरांनी उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्यासाठी लागणारे उन्हाळी माठ,रांजण व इतर वस्तू आदी  लाखोच्या संख्येने बनवून ठेवले आहेत. या कुंभारकारागिरांना चार पैसे कमावण्याचा हा महत्त्वाचा सीझन असतो. त्यावरच त्यांचा वर्षभर कुटुंब चरितार्थ चालतो. अचानकपणे आलेल्या या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश आज बंद आहे. कुंभारानी बनविलेल्या लाखो वस्तूज्याची किंमत करोडो रुपये आहे. त्या रस्त्यावर बाहेर जावून विकता येत नसल्यामुळे घरात पडून आहेत. कुंभार लोक हे अतिशय छोट्या घरात राहतात.या वस्तू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जागा सुध्दा नाही.अन्यथा ग्रामीणकारागीरांवर उपासमारीने मरण्याची वेळ येण्याची भीती  अखिल भारतीयप्रजापती कुंभकार महासंघाचे अध्यक्ष दत्ता कुंंभार यांनी व्यक्त केली.अक्षय तृतीयेला मातीचा कळस पूजन या सणानिमित्त घरो घरी होतअसते.कुंभारसमाजाने त्यासाठी लाखो मातीची भांडी बनविली आहेत.  ती संबधित माणसापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. तसेच कुंभार काम करणाºया व्यक्तीला त्यांनी बनविलेले हजारो उन्हाळी माठ, सुरया, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागणारी कुंभारी भांडी रोडवर तशेच गलोगल्ली विकण्यासाठी परवानगी देण्यात यावी.प्रत्येक तालुक्यात ५० ते ६० कुटुंबांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी द्यावी लागणार आहे. सदर मातीच्या वस्तू न विकता घरात पडून राहिल्यास कुंभार कारागिरावर उपाशीपोटी राहण्याची वेळ येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSubhash Desaiसुभाष देसाईAkshaya Tritiyaअक्षय तृतीया