शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्राच्या सक्तीमुळे हजारो विद्यार्थी हैराण, आॅनलाइन शिष्यवृत्ती अचानक आॅफलाइन

By यदू जोशी | Updated: January 23, 2018 04:00 IST

मॅट्रिकोत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात प्रमाणपत्र सादर करण्याची अट लागू नसताना त्यासाठी सक्ती केली जात असल्याने हजारो विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शिवाय, शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया आॅफलाईन करून सरकारने घोळात भर टाकली आहे.

मुंबई : मॅट्रिकोत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात प्रमाणपत्र सादर करण्याची अट लागू नसताना त्यासाठी सक्ती केली जात असल्याने हजारो विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शिवाय, शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया आॅफलाईन करून सरकारने घोळात भर टाकली आहे.महाडीबीटी पोर्टलवरुन आॅनलाइन अर्ज मागविले जात असताना आता अचानक या पद्धतीत तांत्रिक दोष असल्याचे कारण पुढे करीत शिष्यवृत्तीची प्रक्रिया आॅफलाइन करण्याचा निर्णय घतला. या घोळात शैक्षणिक वर्ष निघून गेले तर शिष्यवृत्ती मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. कोणत्या अभ्यासक्रमांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याची यादी ३१ जुलै २००८ रोजीच्या जीआरमध्ये सामाजिक न्याय विभागाने दिली होती. त्यात अभ्यासक्रम आणि त्या व्यतिरिक्तच्या अभ्यासक्रमांसाठी आता जात प्रमाणपत्र मागितले जात असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.या अभ्यासक्रमांसाठीच द्यावे लागते जात प्रमाणपत्र-आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम, उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणारे अभियांत्रिकी, औषधीनिर्माण शास्त्र, एचएमसीटी पदविका अभ्यासक्रम, अभियांत्रिकी, औषधीनिर्माण शास्र, एचएमसीटी, आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रम, एमबीए, एमसीए पदव्युत्तर अभ्यासक्रम, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच बीएस्सी (जैव तंत्रज्ञान), दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमात शिकणारे विद्यार्थी.शिष्यवृत्तीच्या आॅनलाइन अर्जाची पद्धत सामाजिक न्याय विभागाने रद्द केली आहे. आता ते काम आॅफलाइन केले जात आहे. त्यामुळे महाडिबिटीवर जात प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रश्नच नाही. केवळ काही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून जात प्रमाणपत्र मागितले जाणार नाही.- दिनेश वाघमारे, सचिव, सामाजिक न्याय विभाग

टॅग्स :Studentविद्यार्थीCaste certificateजात प्रमाणपत्र