म्हाडा घरांसाठी लाखभर इच्छुक

By Admin | Updated: January 31, 2016 02:16 IST2016-01-31T02:16:38+5:302016-01-31T02:16:38+5:30

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४ हजार २७५ घरांची लॉटरी २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. या लॉटरीसाठी ९९ हजार ४७२ जणांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ३१ हजार ७१0 अर्जदारांनी

Hundreds of millions of interested in MHADA homes | म्हाडा घरांसाठी लाखभर इच्छुक

म्हाडा घरांसाठी लाखभर इच्छुक

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४ हजार २७५ घरांची लॉटरी २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. या लॉटरीसाठी ९९ हजार ४७२ जणांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ३१ हजार ७१0 अर्जदारांनी पैसे भरले आहेत.
म्हाडाने विरार बोळींज, मीरारोड, ठाणे येथील ४ हजार २७५ घरांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या लॉटरीला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद लाभत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत ९९ हजार ४७२ जणांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ७४ हजार ७२५ अर्जदारांचे अर्ज अपूर्ण आहेत. अर्जदारांना ७ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाइन नोंदणी करता येणार आहे, तर ९ फेब्रुवारीपर्यंत अर्जदारांना आॅनलाइन पेमेंट करता येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of millions of interested in MHADA homes