शंभर रूपयांसाठी मित्राची निर्घृण हत्या

By Admin | Updated: August 13, 2016 16:03 IST2016-08-13T16:03:54+5:302016-08-13T16:03:54+5:30

केवळ शंभर रूपयासाठी मित्रावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे मारल्याची खळबळजनक घटना उमरी (मेघे) परिसरात घडली

For a hundred rupees, a cruel assassination of a friend | शंभर रूपयांसाठी मित्राची निर्घृण हत्या

शंभर रूपयांसाठी मित्राची निर्घृण हत्या

>ऑनलाइन लोकमत -
वर्धा, दि. 13 - मित्रच मित्राच्या जीवाला जीव देतात, प्रसंगी कितीही पैसे खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहत नसल्याचे आपण बरेचदा पाहतो, अनुभवतो. पण केवळ शंभर रूपयासाठी मित्रावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे मारल्याची खळबळजनक घटना उमरी (मेघे) परिसरात घडली. 
 
राजू रामरावजी देहारे (३०) असे मृतकाचे तर सुरेंद्र श्रावण खंडाळे असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार सुरेंद्र खंडाळे याने राजू देहारेकडून शंभर रूपये उधार घेतले होते. पैसे मागण्यासाठी राजू हा सुरेंद्रच्या घरी गेला. यावेळी दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. वाद सुरू असताना रागाच्या भरात सुरेंद्रने राजूच्या शरीरावर सत्तूर सारख्या धारदार शस्त्राने सात ते आठ वार केले. यात राजूचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे राजू आणि सुरेंद्र हे दोघेही बालपणीपासून चांगले मित्र होते. असे असतानाही केवळ शंभर रूपयांसाठी सुरेंद्रने राजूची हत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
 
राजूची आई शेवंता देहारे हिच्या तक्रारीवरून सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी राजू विरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. पुढीत तपास सावंगी पोलीस करीत आहे.
 

Web Title: For a hundred rupees, a cruel assassination of a friend