ST NCMC Card News: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस तिकीट आणि सवलतीसाठी आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. एसटी बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी आदी सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या कार्डासाठी नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार प्रवाशांनी यासाठी नोंदणी केली आहे.
राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवासातील सवलतींकरिता आता 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. या कार्डची नोंदणी विभागीय कार्यालय आणि डेपोमध्ये सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे १० हजार प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी तीन हजारांहून अधिक अधिकृत एजंट नियुक्त केले आहेत. बस स्थानकांवर नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने
'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' चे लाभार्थी कोण? शुल्क १९९ रुपये
नवीन कार्ड घेण्यासाठी १९९ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, हे कार्ड जुने झाल्यावर जमा केल्यास १४९ रुपयांत पुन्हा नवीन कार्ड मिळणार आहे. या कार्डमध्ये किमान १०० रुपये असणे अनिवार्य आहे. तसेच, कार्डचा रिचार्ज ५० रुपयांच्या पटीत करावा लागणार आहे. रिचार्जसाठी ईटीआयएम मशिन, अधिकृत संकेतस्थळ, अॅप किंवा नियुक्त एजंटकडून सहज करता येणार आहे. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 'सरल' क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवाशांना युडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येणार आहे. याशिवाय, स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या नागरिकांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण करण्यात येत आहे.
दरम्यान, एसटीकडून विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी आदी सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोटे ओळखपत्र आणि कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे महामंडळ निदर्शनास आले होते. त्यामुळे योग्य प्रवाशालाच सवलतीचा लाभ घेता यावा, तसेच व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असून सवलतींची अचूक नोंद या कार्डमुळे शक्य होणार आहे.
Web Summary : Maharashtra State Transport (ST) mandates NCMC card for bus ticket concessions. Over 10,000 registered for benefits, including students, seniors, and disabled citizens. Card costs ₹199; recharge available via app, website, or agents. Aims to curb fraudulent ID use, ensuring transparent concession distribution.
Web Summary : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) ने बस टिकट रियायतों के लिए एनसीएमसी कार्ड अनिवार्य किया। छात्रों, वरिष्ठ नागरिकों और विकलांग नागरिकों सहित 10,000 से अधिक लोगों ने लाभ के लिए पंजीकरण कराया। कार्ड की कीमत ₹199 है; ऐप, वेबसाइट या एजेंटों के माध्यम से रिचार्ज उपलब्ध है। धोखाधड़ी वाले आईडी उपयोग को रोकने और रियायत वितरण में पारदर्शिता सुनिश्चित करने का लक्ष्य है।