शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच

By गणेश वासनिक | Updated: June 11, 2025 10:00 IST

Sanjay Rathore News: मुख्यमंत्र्यांच्या रडारवर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना, त्यांना पुन्हा ‘अर्थ’पूर्ण मुदतवाढ देण्यात आली आहे.

- गणेश वासनिकअमरावती - मुख्यमंत्र्यांच्या रडारवर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना, त्यांना पुन्हा ‘अर्थ’पूर्ण मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यभरातील सहा विभागांत बदल्यांमध्ये कोट्यवधींचा ‘गेम’ झाला आहे. त्यामुळे मृद व  जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्या खात्यात नेमके चालले तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. 

मृद व जलसंधारण खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीने नियुक्त्या ३० मे २०२५ रोजी करण्यात आल्या. मात्र, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागात उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ‘अ’, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण या पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना नियमांना फाटा देण्यात आला आहे. विभागनिहाय बदल्यांच्या यादीत कोण अधिकारी कुठे होते आणि कुठे नियुक्ती मिळाली, यातच सर्व काही दडले आहे. या बदली यादीवर मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांचा आशीर्वाद असल्याचे दिसून येते.

विदर्भात मुदतवाढ देण्याचा सपाटामृद व जलसंधारण विभागाने अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करताना ‘मर्जी’ सांभाळणाऱ्या काही जणांना ‘मागणी’नुसार त्याच जागेवर मुदतवाढ दिली आहे. यात राजेश बहुरिया (चंद्रपूर), जी. टी. काळकर (चंद्रपूर), एच. जी. कानडे (मुखेड) यांचा समावेश असून, विदर्भातच मुदतवाढ देण्याचा प्रकार अधिक दिसून येतो. अश्विनकुमार पवार (यवतमाळ), प्रशांत आवंदकर (चांदूर बाजार), मोहिनी धोंडे (नांदगाव खंडेश्वर) यांना खेटून असलेल्या ठिकाणी बदली मिळाली आहे.

बदल्यांमध्ये सेटिंग, यवतमाळचा ‘पराग’ कोण?मृद व जलसंधारण विभागाच्या ३० मे २०२५ रोजी विविध संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांत यवतमाळ येथील ‘पराग’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याची माहिती आहे. यादी ‘ओके’ करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. बदली असो वा मुदतवाढ, ‘पराग’च्या माध्यमातूनच करण्याचे फर्मान होते. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या बदलीपात्र अधिकाऱ्यांनी मे महिन्याच्या प्रारंभीच सेटिंग केली होती. 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAmravatiअमरावती