झोन बदलासाठी प्रचंड शुल्क
By Admin | Updated: May 8, 2015 04:18 IST2015-05-08T04:18:23+5:302015-05-08T04:18:23+5:30
महापालिका क्षेत्रांव्यतिरिक्त त्यांना लागून असलेल्या तसेच नगरपालिका आणि ग्राम पंचायतींच्या हद्दीतील जमिनींचा वापर बदलण्यासाठी (झोन चेंज) प्रचंड शुल्क

झोन बदलासाठी प्रचंड शुल्क
अमर मोहिते, मुंबई
हिट अॅण्ड रनच्या खटल्याचा निकाल जाहीर केल्यानंतर बहुधा न्यायदेवतेनेही अभिनेता सलमान खानचे आभार मानले असतील़ कारण एक अपघातातील संशयित आरोपी, साक्षीदार व इतर पुरावे उपलब्ध असतानाही या खटल्याचे कामकाज संपण्यासाठी तब्बल १३ वर्षांचा कालावधी लागला़ आपली न्यायदान प्रक्रिया बघितली तर १३ वर्षांच्या कालावधीत अशा अपघाताचा खटला संपून त्यातील आरोपी शिक्षा भोगून कारागृहबाहेर पडला असता़ आता सलमान वयाची पन्नाशीही पूर्ण करणार आहे़ १३ वर्षांत अभिनेता म्हणून यशस्वीरीत्या कामगिरी बजावल्यानंतर खटल्याचा निकाल लागणे याला भाग्यच म्हणावे लागेल.
हा खटला प्रलंबित राहण्यासाठी नेमके कोणाला दोषी धरायचे, असा प्रश्न पडला तरी तज्ज्ञ व जाणकार आपली व्यवस्थाच अशी आहे असे बोलून मोकळे होतील़ त्यामुळे डोळ्यावर पटी असलेल्या न्यायदेवतेने सलमानचे आभार मानल्यास ते वावगे ठरणार नाही़ महत्त्वाचे म्हणजे सलमानला शिक्षा झाल्याने पुढील निवडणुकीला याचे के्रडिट घ्यायला राजकीय पक्ष विसरणार नाहीत़
मुळात हा खटला अगदी सरळ होता़ म्हणजे यामध्ये काही तांत्रिक पुरावे अथवा अडथळा असणारी एकही गोष्ट नव्हती़ ४ आॅक्टोबर २००२ रोजी अपघात झाला़ रस्त्यावर झोपलेल्या चौघांना एका भरधाव जाणाऱ्या गाडीने चिरडले़ त्यात एकाचा बळी गेला़ आता ही गाडी नेमकी कोण चालवत होता हे सिद्ध करणे एवढीच पोलिसांची जबाबदारी होती़ आणि ती असतेच़ पण या खटल्यात पोलिसांनी व सरकारनेही कमालच केली़
या अपघाताप्रकरणी सुरुवातीला सलमानविरोधात केवळ भरधाव गाडी चालवण्याचाच खटला वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू होता़ यात सलमान दोषी आढळला असता तर त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा झाली असती़ अशा या बहुचर्चित खटल्याचे कामकाज १० ते १२ वर्षे चालल्यानंतर पोलीस व सरकार अचानक झोपेतून जागे झाले आणि सलमानविरोधात
सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यासाठी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली़
न्यायालयाने ही मागणी मान्य केली व याचा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला़ सत्र न्यायालयात सलमानचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने ३५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली़ आणि १२, १५ महिन्यांच्या कालावधीत सत्र न्यायालयात या खटल्याचे साक्षी पुरावे व सरकारी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवादही पूर्ण झाला़ विशेष म्हणजे या १५ वर्षांच्या कालावधीत या खटल्यातील सर्वाधिक महत्त्वाचा साक्षीदार सलमानचा सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार रवींद्र पाटील याचे निधन झाले़ तो एकमेव साक्षीदार होता ज्याने या घटनेची तक्रार नोंदवली व घटना घडली तेव्हा सलमानच गाडी चालवत होता, असेही त्याने जबाबात म्हटले होते़
पाटील सरकारी नोकर असल्याने तो विश्वासार्ह साक्षीदार होता़ त्याच्या व्यतिरिक्त त्या गाडीत सर्व सलमानचे सहकारी होते़ त्यामुळे त्यांची साक्ष किती विश्वासार्ह मानावी हाही प्रश्नच आहे़ असे असूनही पोलिसांनी अथक परिश्रम करून या खटल्याचे कामकाज संपवले, याबद्दल त्यांचे कौतुकच
करायला हवे़ आणि न्यायदान जलद करायची घोषणा करणाऱ्या सरकारचा तर यासाठी सत्कारच झाला पाहिजे़ कारण आतापर्यंत
खटला प्रलंबित राहण्याची विविध कारणे जगासमोर आहेत़ आरोपी फरार झाला, साक्षीदार सापडत नाहीत किंवा तांत्रिक पुरावे तपासणीसाठी राज्याबाहेर पाठवण्यात आले आहेत, अशा सबबी सरकारी पक्ष पुढे करतो़ तसेच बाजू मांडण्याची संधी दिली
नाही़ अमूक अन्याय झाला यांसह अनेक कारणे
देऊन बचाव पक्ष खटला प्रलंबित ठेवतात; पण सलमानच्या खटल्यात असे काहीच नव्हते़
तरीही १५ वर्षे खटल्याचे कामकाज संपण्यास लागली आहेत़
सलमानच्या जागी इतर दुसरा कोणी
आरोपी असता तर त्याला शिक्षा ठोठावून
सरकार व पोलीस आपली पाठ थोपटवत न्यायदानाचा दर कसा वाढत चालला आहे, असा
दावा करायला विसरले नसते़ एवढेच काय तर
अशा आरोपीला जामीन कसा मिळणार नाही
याचीही खबरदारी घेतली असती़ कारण
सलमानने मद्यपान केले होते, असाही पोलिसांचा आरोप आहे़ आणि मद्यपान करून गाडी चालवणारा समाजासाठी कसा घातक आहे हे सांगायला पोलीस विसरले नसते़