बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

By Admin | Updated: May 24, 2016 18:48 IST2016-05-24T17:55:03+5:302016-05-24T18:48:25+5:30

बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या 25 मे रोजी दुपारी 1 वाजता आॅनलाईन पध्दतीने जाहीर केला जाणार

HSC results will be announced tomorrow | बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 24- महाराष्ट्र राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या 25 मे रोजी दुपारी 1 वाजता आॅनलाईन पध्दतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊन लोड करून घेता येईल. निकालाची मूळ प्रत येत्या 3 जून रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वितरीत केली जाईल, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
 
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत 18 फेब्रुवारी ते 28 मार्च 2016 या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. शासन आदेशानुसार जुलै महिन्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर निकाल जाहीर केला जाणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला तरीही निकालाची तारीख जाहीर केली जात नसल्याने विद्यार्थी व पालकांची उत्सुकता वाढली होती. राज्य मंडळाच्या कार्यालयातील अधिका-यांना दूरध्वनीवरून निकालाबाबत वारंवार विचारणा केली जात होती. अखेर येत्या 25 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.
 

Web Title: HSC results will be announced tomorrow