आजपासून बारावीची परीक्षा

By Admin | Updated: February 21, 2015 02:54 IST2015-02-21T02:54:38+5:302015-02-21T02:54:38+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा शनिवारपासून सुरू होत आहे.

HSC examination from today | आजपासून बारावीची परीक्षा

आजपासून बारावीची परीक्षा

२ हजार ३८९ केंद्रे : राज्यातील १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी देणार परीक्षा
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा शनिवारपासून सुरू होत आहे. राज्यातील १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १ लाख ३८ हजारांनी वाढ झाली आहे.
२१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत राज्यातील २ हजार ३८९ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी मंडळाचे सहायक सचिव अनिल गुंजाळ उपस्थित होते.
यंदा ७ लाख ५७ हजार १३६ मुलांनी तर, ५ लाख ८२ हजार ०६६ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. मागील वर्षी ६ लाख ६४ हजार १२० मुलांनी व ५ लाख ३६ हजार ४२९ मुलींनी नोंदणी केली होती, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
राज्य मंडळातर्फे पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा होईल. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळावा, यासाठी दोन विषयांच्या परीक्षेदरम्यान, काही दिवसांची मोकळीकही ठेवली आहे. त्याचप्रमाणे विभागीय मंडळांमार्फत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यंदाही गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ याप्रमाणे राज्यात एकूण २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे संवेदनशील परीक्षा केंद्रांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार असून, गैरप्रकार टाळण्यासाठी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. अशा प्रकारे परीक्षा यंत्रणेने तयारी केली आहे. (प्रतिनिधी)

च्माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, यंदा ९३ हजार ९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी ७८ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १४ हजारांनी वाढ झाली आहे. तसेच १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांची संख्याही वाढत चालली आहे.

राज्य मंडळाबरोबरच विभागीय मंडळामार्फतही हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

मंडळाचे नावदूरध्वनी क्रमांक
पुणे (०२०) ६५२९२३१६/१७
नागपूर (०७१२) २५६५४०३,२५६०२०९
औरंगाबाद (०२४०) २३३४२२८,२३३४२८४
मुंबई (२४०) २७८९ 3७५६,२७८८ १०७५
नाशिक (०२५३) २५९२१४३
कोल्हापूर (०२३१) २६९६१०१,२६९६१०३
अमरावती (०७२१) २६६२६०८
लातूर (०२३८२) २२८५७०
कोकण (०२३५२) २३१२५०,२२८४८०

च्सकाळी ११ वाजता पेपर सुरू होणार असेल तर विद्यार्थ्यांनी १०.३० वाजता परीक्षा केंद्रात येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे आधी उत्तरपत्रिका दिली जाईल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर बारकोड आणि इतर माहिती भरून घ्यावी. त्यानंतर १०.५० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी केवळ त्याचे वाचन करावे. उत्तरपत्रिका लिहिण्याची प्रक्रिया सुरू केली तर तो गैरप्रकार समजला जाईल.

पुणे : राज्य शिक्षण मंडळाने चालू शैक्षणिक वर्षापासून प्रथमच परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला असून, विद्यार्थ्यांनी या वेळेत केवळ प्रश्नपत्रिकेचे वाचन करून त्यावर विचार करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना या कालावधीत उत्तरपत्रिका सोडवता येणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
सकाळी ११ वाजता पेपर सुरू होणार असेल तर विद्यार्थ्यांनी १०.३० वाजता परीक्षा केंद्रात येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे आधी उत्तरपत्रिका दिली जाईल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर बारकोड आणि इतर माहिती भरून घ्यावी. त्यानंतर १०.५० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी केवळ त्याचे वाचन करावे. उत्तरपत्रिका लिहिण्याची प्रक्रिया सुरू केली तर तो गैरप्रकार समजला जाईल. तसेच बरोबर ११ वाजता पेपर सुरू होण्याची घंटा वाजल्यानंतरच विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास सुरुवात करता येईल.
वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणास्तव प्रत्यक्षिक परीक्षेच्या कालावधीत ज्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांना ३० व ३१ मार्च रोजी प्रात्यक्षिक परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे नमूद करून पाटील म्हणाले, व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर कोणत्याही मार्गाने कॉपीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी मंडळातर्फे आवश्यक काळजी घेण्यात आली आहे. यंदा प्रथमच समुपदेशकांच्या सल्ल्यानुसार अध्ययन अक्षम व आॅटिस्टिक विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारनियमनाची शक्यता असणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शासन आदेशानुसार संबंधितांनी जनरेटरची सुविधा केली आहे.

मुंबई विभागात तीन लाख विद्यार्थी देणार परीक्षा
नवी मुंबई : आजपासून सुरू होणाऱ्या १२वीच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडळ सज्ज झाले आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ३९५ केंद्रांच्या माध्यमातून ३ लाख १९ हजार १८९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
विज्ञान, वाणिज्य, कला, व्होकेशन शिक्षण या क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारपासून सुरू होणार आहे.
परीक्षेसाठी लागणारी सर्व सामग्री विविध जिल्ह्यांतील केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिका पोहोचाव्यात याकरिता ज्या केंद्रात परीक्षेसाठी ५०० विद्यार्थी आहेत अशा ३९५ परीक्षा उपकेंद्रांना या वर्षीपासून परीक्षा केंद्र म्हणून मान्यता शिक्षण मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये कॉपी किंवा गैरप्रकार कमी व्हावेत, यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यात ठाणे जिल्ह्यासाठी ६ पथके, रायगड जिल्हा ६, मुंबई विभाग ५ पथके नेमल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सिद्धेश्वर चांदेकर यांनी सांगितले.

समुपदेशनासाठी हेल्पलाइन
च्विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि त्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन व्हावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून शिक्षण मंडळाच्या वतीने हेल्पलाइन सुरू केली आहे. या वर्षी १४ फेबु्रवारीपासून सुरू केलेल्या हेल्पलाइनला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला जवळपास ४० ते ५० कॉल येत आहेत.
च्यात हॉल तिकिटातील गोंधळ, वेळापत्रकाविषयीची माहिती, अभ्यास कसा करावा आदी माहिती विचारण्यासाठी सर्वाधिक फोन येत आहेत. परीक्षेच्या कालावधीमध्ये ही हेल्पलाइन २४ तास कार्यरत राहणार आहे.

च्विविध प्रश्नांसाठी आतापर्यंत नवी मुंबईतून १८ विद्यार्थ्यांचे फोन आले आहेत. तर रायगड जिल्ह्यातून १०, ठाण्यातून ३० आणि मुंबई विभागातून ८० फोन आतापर्यंत आले आहेत.
च्तसेच महाराष्ट्रातील विविध विभागांतूनही या हेल्पलाइनवर फोन येत आहेत. यासाठी चार कर्मचारी आणि दोन शिक्षण विभाग अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

Web Title: HSC examination from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.