नाशकात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By Admin | Updated: May 25, 2016 21:16 IST2016-05-25T21:16:54+5:302016-05-25T21:16:54+5:30
बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी काळच्या सुमारास घडली.

नाशकात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 25- बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी काळच्या सुमारास घडली. आत्महत्त्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव सायली किसन आव्हाड (18) असे आहे.
सायली आव्हाड अशोका मार्गावरील ज्योती अपार्टमेंटमध्ये राहत होती़. उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायली हिने नुकतीच बारावीच्या विज्ञान शाखेची परीक्षा दिली होती़ दुपारी एक वाजता बारावीचा आॅनलाइन निकाल जाहीर होणार होता.
या परीक्षेत कमी गुण मिळतात की काय या भीतीने सायलीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्त्या केली़. दरम्यान, या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.