शहराला लाभणार ‘एचपी’चे तंत्रज्ञान

By Admin | Updated: July 20, 2016 04:22 IST2016-07-20T04:22:24+5:302016-07-20T04:22:24+5:30

तांत्रिक साहाय्य देण्याच्या दृष्टीने संगणक क्षेत्रातील एचपी एंटरप्रायजेस या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली

HP's technology to benefit the city | शहराला लाभणार ‘एचपी’चे तंत्रज्ञान

शहराला लाभणार ‘एचपी’चे तंत्रज्ञान


ठाणे : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महत्त्वाच्या घटकांसाठी तांत्रिक साहाय्य देण्याच्या दृष्टीने संगणक क्षेत्रातील एचपी एंटरप्रायजेस या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. या वेळी स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्पांना तांत्रिक आणि वित्तीय साहाय्य देण्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली. या बैठकीत पाणीपुरवठा, महिला व मुलांची सुरक्षितता, घनकचरा व्यवस्थापन, वाय-फाय सिटी आदी महत्त्वाच्या घटकाविषयी चर्चा झाली.
एचपी या आंतरराष्ट्रीय कंपनीने पाणीपुरवठा, नागरी सुरक्षितता, नागरी गरिबीचे उच्चाटन करणे, सरकार ते नागरिक कनेक्टिव्हिटी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य यंत्रणा, नागरी सुविधा याबाबत आवश्यक ते तांत्रिक साहाय्य पुरवण्याबाबत आपली सहमती दर्शवली. तसेच आवश्यकता पडल्यास काही स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सुलभ अर्थसाहाय्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ दिवसेकर, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, एचपीई फ्युचर सिटीजचे भारतातील प्रमुख आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख एम. लक्ष्मीनारायण राव, कण्ट्री सेल्स मॅनेजर कमल कश्यप, बिझनेस हेड रवींद्र रानडे, एचपी फायनान्शियल सर्व्हिसेसचे सचिन देशमुख, उपायुक्त संजय निपाणे, संदीप माळवी, अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महापालिका आयुक्तांनी या वेळी उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्षात कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येईल, याचे कंपनीच्या वतीने सादरीकरण केल्यानंतर लगेचच सामंजस्य कराराची प्रक्रि या पूर्ण करता येईल, असे सांगितले.
स्मार्ट सिटीअंतर्गत एचपी या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या तंत्रज्ञानाचा ठाणे शहरासाठी निश्चितपणे उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: HP's technology to benefit the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.