शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

टपालाने मत कसे पाठवतात? विविध अर्जांची करावी लागते पूर्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 09:22 IST

अनेकवेळा हे टपाल पत्रिका मतदान कसे होते नागरिकांना माहिती नसते. त्याकरिता निवडणूक आयोगाचे विविध अर्ज भरावे लागतात. 

- संतोष आंधळे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  आपल्याला अनेकवेळा मतदान मोजणीच्या वेळी लक्षात येते की, पहिली मतदान मोजणी टपाल मतपत्रिकांची होणार आहे. त्यानंतर नागरिकांनी ईव्हीएमने केलेल्या मतदानाची मोजणी होत असते. मात्र अनेकवेळा हे टपाल पत्रिका मतदान कसे होते नागरिकांना माहिती नसते. विशेष म्हणजे हे मतदान करणारे मतदार हे निवडणूक कर्तव्यावर, अत्यावश्यक सेवा, लष्करी सेवामध्ये काम करणाऱ्यासाठी असते. त्याकरिता निवडणूक आयोगाचे विविध अर्ज भरावे लागतात. 

सर्व्हिस व्होटर  लष्करी सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी याना इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टिम, हे संगणकीय मतदान असून त्यांना येणाऱ्या ओटीपीच्या आधारे मतदान करता येते. या अशा पद्धतीने मतदान करणारे २७५ मतदार या मतदारसंघात आहेत. 

१२ क्रमांकाच्या अर्जाद्वारे मतदान      निवडणूक प्रक्रियेत कर्तव्यावर असणारे कर्मचारी यांचे मतदान १२ क्रमांकाच्या अर्जाद्वारे होते. ते ज्या मतदारसंघात काम करत आहे, त्यांचे मतदान हे त्यांच्या मतदारसंघाबाहेर आणि त्या ठिकाणी ते मतदानासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही.      या व्यक्तींना या अर्जाद्वारे टपाल मत पत्रिकेद्वारे मतदान करता येते. पूर्वी त्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर टपाल मतदान पत्रिका जात होती. मात्र ती पद्धत यावेळी बंद केली आहे.      त्यांना ज्या ठिकाणी कर्तव्यावर आहे त्याठिकाणी ही त्याच्या मतदारसंघाची टपाल मतदान पत्रिका दिली जाईल.      त्यांनी मतदान करून ती मतदान पत्रिका त्या ठिकणी असणाऱ्या पेटीत बंद लिफाफ्यात टाकायची आहे.      त्या पत्रिकेवर मतदारसंघाची पूर्ण माहिती असते.

१२ ड क्रमांकाचा अर्ज   अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी असून यांचे मतदान हे इतर मतदारसंघात आहेत. मात्र त्यांची सेवा अत्यावश्यक असल्याने या मतदारांना आहे त्या ठिकाणाहून १२ ड अर्जाच्या माध्यमातून मतदान करता येते. त्यांना हे मतदान करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात येऊन मतदान करावे लागते. त्यांना देण्यात आलेली टपाल मतपत्रिका मतदान पेटीत टाकावी लागते. 

१२ अ क्रमांकाचा अर्ज यामध्ये निवडणूक प्रक्रियेत काम करणारे कर्मचारी हे मुंबई दक्षिण मतदारसंघातील आहेत. मात्र त्यांना त्याच्या मतदान केंद्रावर जायला मिळत नाही. त्यावेळी त्यांनी कर्तव्यावर असताना तेथील मतदान केंद्रावर राहून मतदान करता येते. त्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यात येते. ते दाखवून ते मतदान करू शकतात. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Post Officeपोस्ट ऑफिस