शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त भेटी कशा व्हायच्या? अमृता फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 10:00 IST

Amruta Fadanvis: परवा विधानसभेत बोलताना Eknath Shinde यांनी आपण Devendra Fadnavis यांना रात्री गुप्तपणे भेटायचो, असं विधान केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यातील गुप्त भेटींबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नागपूर - जून महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या राजकीय नाट्यात अनेक अंक समोर आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल्याने राज्यात मोठी उलथापालथ होऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेले. तर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. दरम्यान, परवा विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपण देवेंद्र फडणवीसांना रात्री गुप्तपणे भेटायचो, असं विधान केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यातील गुप्त भेटींबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्रजी रात्री उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे माझ्या फार लक्षात आले नाही. पण कधी कधी ते रात्री उशिरा वेशांतर करून बाहेर पडायचे. मलाही त्यांना ओळखणं कठीण जायचं. मी विचारलं तरी विषय टाळायचे. मात्र काही ना काही चाललंय, याची कल्पना मला आली होती. 

एकनाथ शिंदेंच्या भाषणामधून सर्वच पक्षाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती, हे आपल्याला समजलं असेलच. ती कुठे ना कुठे बाहेर पडणारच होती. त्याला बळ देण्याचं त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम भाजपाने केलं, असेल तर ते चांगलंच आहे, असेही त्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस हे राजकारण सोडूनही समाजसेवा करू शकतात. याची मला जाणीव आहे. ती जावीण लोकांनाही झाल्याने देवेंद्र फडणवीस यांची लोकांमधील प्रतिमा उंचावली आहे, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे