कर्मचाऱ्यांचे वेतन कसे देणार?

By Admin | Updated: June 23, 2014 01:16 IST2014-06-23T01:16:45+5:302014-06-23T01:16:45+5:30

महापालिका कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून वेळेवर वेतन मिळत नाही. मे महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. एक-दोन दिवसात वेतन दिले जाईल. परंतु आर्थिक स्थित बिकट असल्याने पुढील महिन्यात वेतन कसे देणार,

How to pay employees salary? | कर्मचाऱ्यांचे वेतन कसे देणार?

कर्मचाऱ्यांचे वेतन कसे देणार?

महापालिका : एलबीटीमुळे आर्थिक स्थिती बिकट
नागपूर : महापालिका कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून वेळेवर वेतन मिळत नाही. मे महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. एक-दोन दिवसात वेतन दिले जाईल. परंतु आर्थिक स्थित बिकट असल्याने पुढील महिन्यात वेतन कसे देणार, असा प्रश्न मनपा प्रशासनापुढे उभा ठाकला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) चा मनपाच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच राज्य शासनाने या संदर्भात अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. एलबीटी रद्द होणार अशी आशा असल्याने व्यपाऱ्यांचा एलबीटीला प्रतिसाद नसल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता नाही.
१५ जूनपर्यत एलबीटीच्या माध्यमातून ३ कोटी १० लाख मनपा तिजोरीत जमा झाले तर १५ मे पर्यंत ६ कोटी ५३ लाखांची वसुली झाली होती. एलबीटीच्या माध्यमातून दर महिन्याला ३० ते ३५ कोटंींचा महसूल जमा होतो. परंतु मे महिन्यात २७ क ोटी १६ लाखांचेच उत्पन्न झाले. अपेक्षित महसूल मिळत नसल्याने मनपापुढे आर्थिक समस्या उभी ठाकली आहे. यातूनच मे महिन्याच्या वेतनाला विलंब झाला आहे.
मनपाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला ६३ कोटींच्या निधीची गरज असते. या तुलनेत उत्पन्न नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: How to pay employees salary?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.