‘मिहान’मध्ये विजेचा नेमका दर किती?

By Admin | Updated: November 24, 2014 01:23 IST2014-11-24T01:23:19+5:302014-11-24T01:23:19+5:30

मिहानमध्ये सोमवारपासून प्रति युनिट ४.३० रुपये दराने वीज उपलब्ध होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले तर दुसरीकडे ‘एमएडीसी’ने ४.३९ रुपये

How much is the electricity in Mihan? | ‘मिहान’मध्ये विजेचा नेमका दर किती?

‘मिहान’मध्ये विजेचा नेमका दर किती?

नागपूर : मिहानमध्ये सोमवारपासून प्रति युनिट ४.३० रुपये दराने वीज उपलब्ध होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले तर दुसरीकडे ‘एमएडीसी’ने ४.३९ रुपये दराने वीज पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिहान-सेझमधील उद्योगांना नेमकी कोणत्या दराने वीज मिळेल, यावर उद्योजकांमध्ये संभ्रम पसरला आहे.
वीज दरात प्रति युनिट ९ पैसे फरकाचा उद्योजकांना फटका बसणार आहे. एखाद्या उद्योगाला महिन्याला १० हजार युनिट वीज लागत असेल तर दरातील तफावतीमुळे त्यांची ९०० रुपयांची बचत होईल. त्यामुळे विजेचा नेमका दर किती हे आता एमएडीसीने जाहीर करावे आणि उद्योजकांमधील संभ्रम दूर करावा, असे मत उद्योजकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले.
उद्योजकांना सोमवारपासून नव्हे तर शनिवार मध्यरात्रीपासून ४.३९ रुपये दराने वीज पुरवठा सुरू झाला आहे. तशा आशयाचे परिपत्रक राज्य वीज नियामक आयोगाने काढले आहे. पण गडकरी यांच्या वक्तव्यानंतर उद्योजकांना वीज प्रति युनिट ९ पैसे स्वस्त मिळत असेल तर त्याचे स्वागतच आहे. स्वस्तात वीज पुरवठा व्हावा, अशी उद्योजकांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. रविवारी झालेल्या ‘वेद’च्या चर्चासत्रात शहरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकडे ‘एमएडीसी’चे दर आणि दुसरीकडे गडकरींनी सांगितलेले दर यापैकी नेमक्या कुठल्या भावाने वीज मिळेल, असा प्रश्न उपस्थित उद्योजकांना पडला. ९ पैशांचा फरक व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडवू शकतो, याची उद्योजकांना जाण आहे. गडकरींनी चुकीने ४.३९ ऐवजी ४.३० असे सांगितले असावे, असे उद्योजक म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: How much is the electricity in Mihan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.