शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

काँग्रेस-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:22 IST

महायुतीला कौल : जनमत चाचण्यांनी वाढविली उत्सुकता

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किती जागा मिळणार याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केल्यामुळे राजकीय नेत्यांसह विश्लेषकही संभ्रमात आहेत.

२०१४च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला ४८ पैकी ४२ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी महायुतीच्या जागांमध्ये घट होण्याची शक्यता बहुतेक एक्झिट पोलने वर्तविली आहे. तर न्यूज १८- आयडीएसओएसच्या अंदाजानुसार काँग्रेसला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना युतीला ३७ तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने प्रत्येकी २२ जागा लढविल्या. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून हातकणंगले आणि अमरावती तर काँग्रेसने सांगली आणि पालघर या जागा आघाडीतील घटक पक्षांना दिल्या. सांगली आणि हातकणंगले या दोन जागांवर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उभे होते. अमरावतीची जागा नवनीत राणा यांनी लढविली तर पालघरची जागा बहुजन विकास आघाडीने लढविली. मागच्या निवडणुकीत राजू शेट्टी हे हातकणंगले येथून विजयी झाले होते. यावेळीची त्यांच्या विजयाची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, सांगलीत काय होणार, याबाबत उत्सुकता आहे. येथून स्व.वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील स्वाभिमानीकडून उभे होते.

अशोक चव्हाण (नांदेड), सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माणिकराव ठाकरे (यवतमाळ), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) आणि प्रिया दत्त (उत्तर मध्य) या जागा तर हमखास निवडून येतील असा दावा काँग्रेस नेते करत आहेत.एक्झिट पोलचा अंदाज आम्हाला मान्य नाही. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किमान २४ ते २५ जागा मिळतील.-अशोक चव्हाण,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसजनमत चाचण्यांचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही. २३ मे रोजी निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल, मात्र भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येईल.-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्रीअंदाज अपना-अपनाएबीपी-नेल्सन : भाजप १७, शिवसेना १७, काँग्रेस ४, राष्ट्रवादी ९ आणि इतरांना १ जागा मिळतीलटीव्ही-९ सीव्होटर्स : भाजप १९, शिवसेना १५,काँग्रेस ८, राष्ट्रवादी ६ जागा मिळतीलन्यूज १८- आयडीएसओएस : भाजप २१ ते २३, शिवसेना २० ते २२, काँग्रेस १, राष्ट्रवादीला ४-६ व इतरांना ३-५ जागांची शक्यता
इंडिया टुडे अ‍ॅक्सिस माय इंडिया : शिवसेना-भाजपला ३८-४२ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ६-१० जागा मिळतीलरिपब्लिक जन की बात : युतीला ३४ ते ३९ तर आघाडीला ८ ते १२ जागा मिळण्याचा अंदाज आहेन्यूज २४-टुडे्ज चाणक्य : शिवसेना-भाजपला ३८ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला १० जागा मिळतीलरिपब्लिक सी व्होटर्स : शिवसेना-भाजपला ३४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला १४ जागा मिळतीलएनडीटीव्हीचा पोल आॅफ पोल्स : महायुतीला ३५ तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला १२ आणि इतरांना १ जागा मिळेल

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस