नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बुडाला? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं

By Admin | Updated: February 12, 2017 19:51 IST2017-02-12T19:47:52+5:302017-02-12T19:51:23+5:30

शिवसेना-भाजपा यांच्यात कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. दोघांकडून एकमेंकावर आरोप-प्रत्यरोप केले जात आहेत.

How many black money was lost after an annotation? It should be said by Uddhav Thackeray | नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बुडाला? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं

नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बुडाला? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा काळा पैसा किती बुडाला आणि त्याची झळ त्यांना किती बसली असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उडवली.

शिवसेना-भाजपा यांच्यात कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. दोघांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आजच्या मुंबईतील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष्य करत टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे काँग्रेस विरोधात लढले आणि त्यांचं कौतुक करताना उद्धव ठाकरे थकत नाहीत. गुहेत बसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलतात ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत दाखवली, 56 इंचची छाती असावी लागते. आपल्या घरात राहून कोणीही शेर असतो एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाहा असा टोला शिवसेनेला लगावला.

Web Title: How many black money was lost after an annotation? It should be said by Uddhav Thackeray