ब्राह्मणांचे कर्तृत्व किती दिवस झाकणार?
By Admin | Updated: March 21, 2015 00:22 IST2015-03-21T00:22:12+5:302015-03-21T00:22:12+5:30
‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाच्या चवथ्या वर्धापनानिमित्त निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा ब्राह्मण भूषण पुरस्काराने पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

ब्राह्मणांचे कर्तृत्व किती दिवस झाकणार?
पुणे : ब्राह्मणांनी ़इतिहासात गाजविलेले कर्तृत्व किती दिवस झाकून ठेवले जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित करतानाच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुद्धी आणि प्रतिभा असलेल्या ब्राह्मणांनी प्रचंड महत्त्वाकांक्षी असले पाहिजे, अशी अपेक्षा आज येथे व्यक्त केली.
‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाच्या चवथ्या वर्धापनानिमित्त निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा ब्राह्मण भूषण पुरस्काराने पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ‘आम्ही सारे ब्राह्मण’चे संपादक गोविंद हर्डिकर, कार्यकारी संपादक भालचंद्र कुलकर्णी, उद्योजक श्रद्धा वर्दै व्यासपीठावर होते. समाजासाठी योगदान देणाऱ्या दिलीप अलोणी, अशोक बेंबळीकर, प्रथमेश दाते, अनिल गोरे, विनय दाते तसेच उदय बापट व विश्राम कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
कारकुनीपेक्षा उद्योग, कला, साहित्य अशा क्षेत्रात क र्तृत्व गाजवा, असे आवाहन करून पुरंदरे म्हणाले की आपल्या महत्त्वाकांक्षा थिट्या
आहेत. आपण आपल्याविषयी गैरसमज बाळगले आहेत. अंधार दूर करण्याची फक्त प्रार्थना करून उपयोगाचे नाही. इतिहासात गाजविलेल्या कर्तृत्वाचा आविष्कार नव्या पिढीला दाखवा. (प्रतिनिधी)
भारतीय असणे ही खूप मोठी भावना !
४कारगील युध्दाच्या वेळी साऱ्या देशातून रोख, वस्तूंच्या रूपात मदत येत होती. गोरखपूर येथे असताना एका रेल्वे स्टेशनवर एका भिकाऱ्याने माझ्याकडे अडीच हजार रुपये दिले. तिथल्या साऱ्या भिकाऱ्यांनी पैसे एकत्र जमवून सैन्यासाठी, देशासाठी मदत केली ... हा किस्सा सांगताना भूषण गोखले यांच्या भावना अनावर झाल्या.
इतिहास आणि भुगोलाची सांगड असते. भुगोलामुळे युध्दे होतात. जम्मू काश्मिरचा मोठा भाग आज पाकिस्तानने बळकाविलेला आहे ही अतिशय वाईट घटना आहे. पासष्टच्या युध्दात मात्र आपण काश्मिरमध्ये घुसलेल्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आपल्या देशात चांगले काय आहे हे आपण पाहत नाही.
- भूषण गोखले