शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांना न जोडणारा शक्तिपीठ महामार्ग कसा ?; सांगलीतील शेतकऱ्याचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:41 IST

सांगली : अनेक शेतजमिनी, वनजमिनी नष्ट करण्याचे नियोजन करीत शक्तिपीठ महामार्गाचे काम रेटले जात आहे. मात्र, आराखड्यात बहुतांश मंदिरांना ...

सांगली : अनेक शेतजमिनी, वनजमिनी नष्ट करण्याचे नियोजन करीत शक्तिपीठ महामार्गाचे काम रेटले जात आहे. मात्र, आराखड्यात बहुतांश मंदिरांना कोसो दूर ठेवणारा हा महामार्ग शक्तिपीठ महामार्ग कसा होऊ शकतो, असा सवाल कवलापूर (ता. मिरज) येथील महामार्ग बाधित शेतकऱ्याने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे उपस्थित केला आहे.कवलापूर (ता. मिरज) येथे संभाजी दिनकर सावंत यांची जमीन आहे. शक्तिपीठ महामार्ग या जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे या महामार्ग प्रकल्पावर सावंत यांनी हरकत घेतली आहे. दुसरीकडे त्यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून महामार्गाच्या हेतूबद्दल संशय व्यक्त केला आहे. प्रकल्पाचा आराखडा, त्याची छायाचित्रे पाठवून त्यांनी पुराव्यानिशी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

पत्रात मांडलेली निरीक्षणे

  • हा रस्ता पवनार येथून चालू न होता वर्ध्याच्या पालीकडे असलेल्या झडगाव या गावाजवळून सुरू होतो.
  • शक्तिपीठ माहूरगड याला हा रस्ता जोडलेलाच नाही.
  • तुळजापूरला हा रस्ता कुठेही जोडला गेला नाही.
  • श्री क्षेत्र औदुंबर हे ठिकाण नियोजित शक्तिपीठ महामार्गापासून कोसो दूर राहणार आहे.
  • कोल्हापूरचे अंबाबाई मंदिरही या महामार्गाला जोडले गेले नाही.

महापुराचा फास आणखी आवळणारनागपूर, रत्नागिरी तसेच पुणे ते बेंगळुरू महामार्ग कोल्हापूरच्या जवळून गेले आहेत. आता शक्तिपीठ हा तिसरा महामार्ग झाला, तर रस्त्याच्या भरावामुळे कोल्हापूर व सांगली शहराला महापुराचा फास आणखी आवळेल, असे पत्रात म्हटले आहे.

वन विभाग, रेल्वे विभागाची परवानी का नाही?वनक्षेत्रातून तसेच रेल्वे रुळ ओलांडून जाणाऱ्या या महामार्गाच्या कामासाठी वन विभाग, रेल्वे तसेच अन्य संबंधित शासकीय विभागांच्या परवानग्या घेणे कायद्याने बंधनकारक आहे, तरीही त्या परवानग्या का घेतल्या नाहीत, असा सवाल सावंत यांनी केला आहे.

सल्लागार समिती स्थापनमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सावंत यांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी विविध यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात येतील, त्यासाठी महामंडळामार्फत पर्यावरणीय आघात अभ्या, वन्यजीव संरक्षण तसेच बाधित वनक्षेत्राच्या अभ्यासाकरिता सल्लागार समिती नियुक्त केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग