शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'राजसाहेबांच्या शब्दाला किती महत्त्व आहे...', भाजपच्या निर्णयानंतर शालिनी ठाकरेंचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 14:46 IST

सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे.

मुंबई- सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला अर्ज परत घेतला. याबाबत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली. त्यानंतर, मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत राज ठाकरेंच्या शब्दाचे महत्व अधोरेखित केले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वप्रथम पत्र लिहून भाजपला अंधेरीतील पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्वायी, अशी विनंती केली होती. त्यानंतर, शरद पवारांचे आवाहन आणि प्रताप सरनाईक यांचे पत्र, त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये तातडीच्या बैठका झाल्या आणि अखेर शिवसेना उमेदवार ऋुतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

यानंतर आता शालिनी ठाकरे यांनी ट्विट केले की, ''सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पत्राला आणि त्यातील प्रत्येक शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात किती महत्त्व आहे, हे शिवसेना, भाजपसह मनसेच्या सर्व टीकाकारांच्या लक्षात आलं असेलच!''

राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्रभाजपच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी भाजपला आणखी एक पत्र लिहिले. ते म्हणाले, " प्रिय मित्र देवेंद्रजी, जय महाराष्ट्र... काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात, ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार." अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिले आहे. 

राज ठाकरे राज्याच्या हिताची भूमिका घेतात - बावनकुळेराज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपनेही निर्णय घेतल्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चा आणखी घट्ट झाल्या आहेत. मात्र, त्यावर, बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात. मात्र, भाजपचा हा निर्णय म्हणजे मनसे-भाजपच्या युतीची नांदी नाही. राज ठाकरे व शरद पवार यांनी घेतलेली भूमिका हा वेगळा भाग होता. शीर्षस्थ नेतृत्वाने हा निर्णय घेतला. अशा प्रकरणात संवेदनशीलता दाखविणे आवश्यक आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाElectionनिवडणूक