शहरातील खड्डे कसे बुजवता? - हायकोर्ट
By Admin | Updated: May 6, 2015 04:36 IST2015-05-06T04:36:11+5:302015-05-06T04:36:11+5:30
रस्त्यांची देखभाल करण्यासाठी व खड्डे बुजवण्यासाठी नेमक्या कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका व नगरपरिषदांना दिले.

शहरातील खड्डे कसे बुजवता? - हायकोर्ट
मुंबई : रस्त्यांची देखभाल करण्यासाठी व खड्डे बुजवण्यासाठी नेमक्या कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका व नगरपरिषदांना दिले.
रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत न्या. गौतम पटेल यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना पत्र लिहिले होते. त्याची दखल घेत मुख्य न्यायाधीश शहा यांनी हा मुद्दा सुओमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतला. न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने खुलासा करण्याचे आदेश दिले. तसेच रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकांनी समाधनकारक खुलासा न दिल्यास येत्या दोन आठवड्यात रस्त्यांचे सर्वेक्षण करून, सहा आठवड्यात रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने बजावले आहे. पुढील सुनावणी ७ मे रोजी होईल.