शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

...ते पत्र नक्की व्हायरल कसं झालं?; अभिनेता किरण माने प्रकरणात भलताच दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 18:29 IST

ग्रामपंचायतीला चित्रीकरणाच्या निमित्ताने गावाला आर्थिक मदत होत असताना अचानकपणे हे पत्र पाठवले जाते म्हणजे याच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत

अभिनव पवार

सातारा - 'मुलगी झाली हो' च्या चित्रीकरणावरून गुळुंब ग्रामपंचायतीने पाठवलेले पत्र नक्की कोणाच्या आदेशाने पाठवले याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य देखील अनभिज्ञ आहेत. वास्तविक गुळुंब गावच्या ग्रामपंचायतीने सरपंच यांचे स्वाक्षरीने काढलेले सदर पत्र पाठवले असले तरी याबाबत बहुतांश ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती. सदर पत्र हे ग्रामपंचायतीच्या कोणत्याही ठरावाशिवाय अगर प्रस्तावाशिवाय पाठवण्यात आल्याने याबाबतचे गौडबंगाल नक्की काय आहे याची शहानिशा होत नाही.

याबाबत गुळुंब येथील सरपंच स्वाती माने यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. तसेच ग्रामपंचायतीला चित्रीकरणाच्या निमित्ताने गावाला आर्थिक मदत होत असताना अचानकपणे हे पत्र पाठवले जाते म्हणजे याच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गुळुंब ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मयुरेश्वर येथे या मालिकेचा सेट उभारण्यात आला असून येथील स्थानिकांना देखील यानिमित्ताने रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र एका पत्रामुळे येथे खळबळ उडाली आहे. हे पत्र नेमके कोणी बनवले व कोणी व्हायरल केले, याबाबतची माहिती अजूनही उघड झाली नाही.

मालिकेच्या सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता किरण माने यांना मालिकेतून बाहेर काढण्याचे कारण हे राजकीय नसून त्यांचा स्वभाव आहे. मात्र याबाबत संपूर्ण राज्यात मतभेद आहेत. मुळातच या मालिकेच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी आधीच ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घेतली होती. परंतु अचानकपणे ही परवानगी नाकारण्याचे पत्र नेमके कोणी व कशासाठी दिले याबाबत अनेक शंका निर्माण होत आहेत.

‘त्या’ पत्रात काय होतं?

अभिनेता किरण माने प्रकरणात गुळुंब ग्रामपंचायतीने नोटीस बजावून पॅनोरमा एंटरटेनमेंट प्रा. लि. या संस्थेला १५ जानेवारी २०२२ पासून गुळुंब ग्रामपंचायतीच्या हद्दीत मालिकेचे चित्रीकरण करण्यास दिलेली परवानगी रद्द करून चित्रीकरण थांबवण्यास सूचना केली. राजकीय भूमिका मांडणाऱ्या एका मराठी कलावंताला घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर केला म्हणून मालिकेतून काढून टाकणं हे घटनेविरोधी आहे,’ असे मत गुळुंब ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती माने यांनी व्यक्त केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या संपूर्ण टीमने महाराष्ट्रात शिवशंभू, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी लोकशाही नांदते, हे विसरू नये, असा सल्लादेखील या पत्राद्वारे देण्यात आला. तसेच, मनुवादी विचारसरणीच्या वाहिनी व ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या गुळुंब गावात होत असलेल्या चित्रीकरणासाठी गुळुंब ग्रामपंचायत मान्यता नाकारत असून अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या गुळुंब गावच्या हद्दीत प्रवेश नाही, अशीही स्पष्टोक्ती सरपंच स्वाती माने यांनी केली होती.

टॅग्स :kiran maneकिरण माने