शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

८६ टक्के समाज साक्षर असताना मराठा समाज शैक्षणिक मागास कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 04:59 IST

राज्यातील विद्यमान ५२ टक्के आरक्षणास धक्का न लावता या विधेयकान्वये मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण लागू झाले आहे.

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील विद्यमान ५२ टक्के आरक्षणास धक्का न लावता या विधेयकान्वये मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण लागू झाले आहे. या कायद्यामुळे मराठा समाजाला राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमध्ये नियुक्ती आणि पदांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राज्यातील काही भाषातज्ज्ञ, अभ्यासक आणि इतर मागासवर्गीय वर्गांशी संलग्न संस्थांनी यावर आक्षेप घेत न्या. गायकवाड आयोगाने दिलेला अहवाल, विधेयक आणि कृतिपत्रिकेतील वेगवेगळ्या प्रमाणावर बोट ठेवत आरक्षणाला विरोध दर्शविला आहे.मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून ते सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा १२०० पानांचा पाहणी अहवाल आणि सर्वेक्षण, संदर्भाचा जवळपास दहा हजार पानांचा अहवाल राज्य सरकारकडे सोपविण्यात आला. त्यानुसार तयार केलेला कृतिपत्रिका अहवाल आणि विधेयक विधिमंडळात सादर केले गेले. त्यानुसार १३.४२% मराठा निरक्षर आहेत. याचाच अर्थ ८६.५८ टक्के समाज साक्षर आहे असा होतो. केंद्राचे साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के, राज्याचे साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्के असताना जर मराठा समाजातील साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के असेल तर त्या समाजाला शैक्षणिक मागासलेपणात १०० टक्के गुण कसे काय देता येतील, असा सवाल प्राध्यापक हरी नरके यांनी उपस्थित केला आहे.कृती अहवालाप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे इंजिनीअरिंगमध्ये असलेले प्रमाण ७.३%, वैद्यकीय शिक्षणातील प्रमाण ६.४ टक्के, कृषीमधील प्रमाण २० टक्के तर इतर म्हणजे मानव विद्या शास्त्र, वाणिज्य व व्यावसायिक शिक्षणातील प्रमाण ३.८९ टक्के इतके आहे. यावरून मराठा समाजात पदवीधरांची एकूण प्रमाण ३६.९६ टक्के आहे. राज्यातील ज्या ओबीसी वर्गाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे त्यांच्या प्रमाणाशी याची तुलना केली गेली का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.>‘वैयक्तिक प्रसिद्धीसाठी विरोध उपस्थित करू नये’एकीकडे या संस्थाकडून असे प्रश्न उपस्थित केले जात असताना दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रमोद पाटील यांनी मिळालेले आरक्षण संवैधानिक असून त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती गायकवाड यांंच्या अध्यक्षतेखाली तयार केला गेलेला अहवाल हा अभ्यास करून तयार करण्यात आला असून त्यावर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा