शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मीच माझे नाव पाकिटावर कसे लिहिणार? राऊतांच्या घरी सापडलेल्या रकमेवर एकनाथ शिंदेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:14 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच सर्व पंचनामे होतील.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मिळणारी मदत कमी असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

 केवळ दोन मंत्र्यांचे सरकार सध्या राज्याचा कारभार हाकत आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता सरकार चांगले चालले आहे की नाही, असा थेट सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांना केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्याची योजना थांबली होती. आम्ही ती योजना पुन्हा कार्यान्वित केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचे धोरण स्वीकारले. छोट्या सिंचन योजनांच्या वीजबिलात प्रतियुनिट एक रुपया आकारणी कमी केली. आम्ही खूप काम करतोय आणि लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ईडीने संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी जप्त केलेल्या पाकिटावर तुमचे नाव होते, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी हे पैसे कुणाच्या घरात सापडले? माझ्या घरी सापडले का? त्यावर कोण लिहू शकतो? मी लिहिणार का? असे प्रतिप्रश्न करत तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा, असा खुलासा केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतFarmerशेतकरी