शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डॉक्टर कसा निवडावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 04:25 IST

आजच्या आयुष्यात प्रत्येक कुटुंबात एक फॅमिली डॉक्टर असणे अत्यंत गरजेचे आहे. फॅमिली डॉक्टरही तसे तीन-चार प्रकारचे असतात किंवा तीन-चार प्रकारच्या डिग्रीधारक असतात. उदाहरणार्थ एम.डी., एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस. अशा प्रकारच्या पदव्या डॉक्टरांच्या ज्ञान शाखा व प्रावीण्य यावर अवलंबून असतात. यापैकी कोणताही डॉक्टर हा आपला फॅमिली डॉक्टर असू शकतो.

- डॉ. अमोल अन्नदाते यथा वैद्ये समर्पणम्!तथा सिद्धे चिकित्सा !!आजच्या आयुष्यात प्रत्येक कुटुंबात एक फॅमिली डॉक्टर असणे अत्यंत गरजेचे आहे. फॅमिली डॉक्टरही तसे तीन-चार प्रकारचे असतात किंवा तीन-चार प्रकारच्या डिग्रीधारक असतात. उदाहरणार्थ एम.डी., एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस. अशा प्रकारच्या पदव्या डॉक्टरांच्या ज्ञान शाखा व प्रावीण्य यावर अवलंबून असतात. यापैकी कोणताही डॉक्टर हा आपला फॅमिली डॉक्टर असू शकतो. जनरल प्रॅक्टिस करणारे बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस व विशेष प्रावीण्य असणारे एम.डी., एम.बी.बी.एस. दोन्हीही प्रकारच्या डॉक्टरांच्या संपर्कात असणे गरजेचे आहे. किरकोळ किंवा साधारण तक्रार असल्यास आपणास जनरल प्रॅक्टिस करणाºया डॉक्टरची मदत होऊ शकते. परंतु काही गंभीर प्रॉब्लेम झाल्यास आपणास विशेष प्रावीण्य असलेले किंवा स्पेशालिटी डॉक्टरचीच आवश्यकता असते.डॉक्टरच्या बाबतीत एक गोष्ट मात्र टाळली पाहिजे, ती म्हणजे वारंवार डॉक्टर बदलणे. आपल्याला एक-दोन भेटीतच हे लक्षात येत असते की आपला डॉक्टर कसा आहे. त्याचे कौशल्य किती आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्याशी आपले जमणार आहे की नाही? ज्या प्रकारे लग्न करताना आपण पूर्ण आयुष्याचा विचार करूनच निर्णय घेतो साधारणत: त्या पद्धतीने आपण आपला फॅमिली डॉक्टर निवडावा. आपल्या अंतर्मनाला ज्यावर विश्वास वाटेल, ज्याच्याशी आपण मोकळेपणाने बोलू शकतो असाच डॉक्टर फॅमिली डॉक्टर म्हणून निवडावा व नंतर मात्र वारंवार डॉक्टर बदलू नये. अगदी मित्रही वारंवार बदलले तरी आयुष्यात स्थिरता नसते. तर डॉक्टर हा जितक्या अधिक वेळापासून आपणास ओळखत असेल तितके निदान करणे हे सोपे असते.एखाद्या डॉक्टरविषयी आपले मत डळमळीत असेल तर त्यास डॉक्टर म्हणून निवडू नये. आपला आपल्या फॅमिली डॉक्टरवर असणारा विश्वास हा आपल्या बरे होण्यामध्ये एक महत्त्वाचा पैलू असतो.ज्या वेळी गंभीर परिस्थितीत पुढील उपचारासाठी आपल्याला मोठ्या डॉक्टरांकडे जावे लागते, त्या वेळी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा. पण तो जर विशिष्ट डॉक्टरकडे जाण्याचा जास्त आग्रह करत असेल व आपण न गेल्यास त्याची वैयक्तिक चिडचिड होत असेल तर ते चांगले नाही. आज वैद्यकीय क्षेत्रात ज्या अनेक स्पेशालिटी निर्माण झाल्या आहेत त्यांची रुग्णास माहिती असणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या डिग्रीवरून किंवा त्यांच्या नावापुढे असलेल्या उपाधीवरून नेमक्या कुठल्या प्रॉब्लेमसाठी त्यांच्याकडे जावे हे अनेकांना अजूनही लक्षात येत नाही. उदा. एंडोक्रायनोलॉजी, नेफ्रोलॉजी, आँकोलॉजी, पल्मोनोलॉजी, व्हेनेरोलॉजी यासारख्या ‘जी’ वेळ काढून आपल्या फॅमिली डॉक्टरकडून किंवा इंटरनेटवरून समजून घ्याव्या. म्हणजे आपल्याला होत असलेल्या त्रासावरून त्या त्या स्पेशालिटी डॉक्टरकडे जाता येईल व यासाठी आपल्या जनरल प्रॅक्टिशिअनवर संपूर्ण अवलंबून राहावे लागणार नाही. तसे प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी स्पेशालिस्टकडे जाण्याची गरज नसते आणि बहुतांश समस्या या एम.बी.बी.एस. नंतर बेसिक पदव्युत्तर डिग्री असलेल्या डॉक्टरकडून सुटू शकतात.डॉक्टर निवडताना आजकाल बºयाचदा त्याच्या कौशल्यापेक्षा त्याच्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकच्या इन्टेरिअर डेकोरेशनकडे लक्ष जाते. म्हणून अनेक जण डॉक्टरचे ग्लॅमर आणि कपडे पाहून डॉक्टर निवडतात. त्यामुळे आजकाल कॉर्पोरेट रुग्णालयांकडे रुग्णांचा ओढा आहे. बालरोगशास्त्रामधील भीष्म पितामह पुण्यातील डॉ. धैर्यशील शिरोळे हे एका भव्य झाडाखाली पेशंट बघायचे. मूल अस्वच्छ असले तर त्यांच्या समोरच असलेल्या नळावर आईला आंघोळ घालायला लावायचे. वैद्यकीय प्रॅक्टिसमधला हा अनौपचारिक जिव्हाळा आता राहिला नाही, कारण रुग्णांनाच तो रोचत नाही.डॉक्टर निवडताना बºयाचदा रुग्ण त्यांचा स्वभाव कसा आहे हेही बघतात. गोड बोलण्याने अर्धा आजार बरा होतो व गोड बोलणारा डॉक्टर हा केव्हाही चांगला. पण डॉक्टर हुशार असेल व त्याचे उपचार चांगले असतील तर त्याच्या स्वभावाकडे फार लक्ष देऊ नये. खरे तर कडवट बोलणारा डॉक्टर हा स्पष्टवक्ता असतो व गोड बोलणाºया डॉक्टरइतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त चांगला असतो.लागू पडणारे औषध हे नेहमी कडूच असते. औषध जितके कडू तितके ते अधिक गुणकारी असे समजून आपल्या चांगल्या डॉक्टरचा शीघ्रकोपी स्वभाव पोटात घ्यावा. उपचारांमधील अनुभवच आपल्याला कालानुरूप डॉक्टर निवडण्याची हुशारी देतो.- amolaannadate@yahoo.co.in

टॅग्स :docterडॉक्टरmedicineऔषधं