वडिलांच्या घरात मुलीनेच केली चोरी
By Admin | Updated: May 22, 2016 00:32 IST2016-05-22T00:32:07+5:302016-05-22T00:32:07+5:30
लष्कर परिसरातील एका एनआयआरच्या घरामध्ये झालेल्या घरफोडीच्या तपासाला वेगळीच दिशा मिळाली असून, ही चोरी कोण्या चोराने नव्हे, तर पोटच्या मुलीनेच केल्याचे निष्पन्न झाले आहे

वडिलांच्या घरात मुलीनेच केली चोरी
पुणे : लष्कर परिसरातील एका एनआयआरच्या घरामध्ये झालेल्या घरफोडीच्या तपासाला वेगळीच दिशा मिळाली असून, ही चोरी कोण्या चोराने नव्हे, तर पोटच्या मुलीनेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलीने हाँगकाँगमधील तरुणाशी विवाह केला असून, ती सध्या हाँगकाँगमध्येच राहण्यास आहे.
अजित डेटाराम लालवाणी (वय ७८, रा. फ्लॅट नं. २३, बी, ग्रेस टेरेस, चौथा मजला, साचापीर स्ट्रीट, कॅम्प) यांनी फिर्याद दिली असून, निना मनिंदर ग्रेवाल (वय ४४, रा. हॉंगकॉंग) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालवाणी हे एन.आर.आय आहेत. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी बँगलोर येथे असते. छोटी मुलगी हॉंगकॉंग येथे असते. ते तैवान देशात पत्नीसह राहतात. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात ते तीन दिवसांसाठी मोठ्या मुलीकडे गेले होते. त्याच काळात निना वडिलांच्या घरी आली होती. बनावट चावीचा वापर करून घर उघडून कपाटातील ३ लाख ५० हजार, ५ हजार अमेरिकन डॉलर्स, लॅपटॉप, डिव्हीडी प्लेअर, टीव्ही आणि बँकेची तसेच मालमत्तेची कागदपत्रे चोरून नेली. (प्रतिनिधी)