वसतीगृह चालकाने विद्यार्थ्याला बदडले
By Admin | Updated: August 12, 2015 02:24 IST2015-08-12T02:24:11+5:302015-08-12T02:24:11+5:30
येथील एका वसतिगृहाच्या चालकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलाच्या पालकांनी चेंबूर, मुुंबई येथील पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध

वसतीगृह चालकाने विद्यार्थ्याला बदडले
पाचगणी : येथील एका वसतिगृहाच्या चालकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलाच्या पालकांनी चेंबूर, मुुंबई येथील पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हा गुन्हा मंगळवारी पाचगणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
कबीर सुरेंद्र सिंह (६, रा. मध्य प्रदेश) हा पूर्वी नितू रवीसिंह (२५ रा. मुुंबई) या आपल्या बहिणीबरोबर मुंबईत राहात होता. कबीरला चांगले शिक्षण मिळावे म्हणून पाचगणीत एका नामवंत शाळेत दाखल करून येथीलच आराध्य इंटरनॅशनल होस्टेलमध्ये ठेवले होते.
कबीर पहिलीत शिकत आहे. होस्टेलचालक मल्हारी जाधवने ‘तुमचा मुलगा शाळेमध्ये भांडण करतो,’ असे सांगितले. तेव्हा नितूने कबीरला दोन दिवसांसाठी मुंबईला आणले.
या वेळी ‘मला दोन दिवस जेवणच दिले नाही. सरांनी मला बाथरूममध्ये बांधून बंद करून ठेवले होते.’ असे कबीरने नीतूला सांगितले. (वार्ताहर)