ठाण्यात कस्तुरबासारखे रुग्णालय उभारणार

By Admin | Updated: February 12, 2015 03:27 IST2015-02-12T03:27:06+5:302015-02-12T03:27:06+5:30

ठाणे येथे राज्य सरकार व महापालिकेच्यावतीने कस्तुरबा रुग्णालयाच्या धर्तीवर संसर्गजन्य आजारावर उपचार करणारे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

A hospital like Kasturba in Thane will be set up | ठाण्यात कस्तुरबासारखे रुग्णालय उभारणार

ठाण्यात कस्तुरबासारखे रुग्णालय उभारणार

मुंबई : ठाणे येथे राज्य सरकार व महापालिकेच्यावतीने कस्तुरबा रुग्णालयाच्या धर्तीवर संसर्गजन्य आजारावर उपचार करणारे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वाईल फ्लूची चाचणी करण्याकरिता एक प्रयोगशाळा उभारण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दालनात ठाण्यातील स्वाईन फ्लूच्या साथीबाबत झालेल्या बैठकीत ठाणे येथे संसर्गजन्य आजाराकरिता स्वतंत्र रुग्णालय नसल्याची बाब उपस्थित करण्यात आली.
स्वाईन फ्लूसारखी साथ आल्यावर रुग्णालये तात्पुरती व्यवस्था करतात. त्यामुळेच राज्याचा आरोग्य विभाग व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा रुग्णालयासारखे अद्ययावत रुग्णालय या परिसरात उभे करण्याचे ठरले.
स्वाईन फ्लूकरिता रुग्णांच्या रक्ताचे नमूने चाचणीकरिता पाठवण्याची सोय मुंबईतील चार तर नागपूर व पुणे येथील प्रत्येकी एक अशा सहा प्रयोगशाळांत आहे. ठाण्यात आणखी एक प्रयोगशाळा सुरु करण्याचेही ठरले. रुग्णांची प्रतिकारक्षमता वाढवणा ऱ्या आॅस्ट्रेलियन कंपनीच्या गोळ््या उपलब्ध करून देण्याबाबतही ठरले आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: A hospital like Kasturba in Thane will be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.