पंतप्रधानांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन; राहुल गांधी, अमित शहा येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:56 IST2018-02-15T00:56:03+5:302018-02-15T00:56:13+5:30
गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून त्यांच्या हस्ते विंध्यगिरी पर्वतावर रोप वे आणि रुग्णालयाचे उद्घाटन होेणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन; राहुल गांधी, अमित शहा येणार
कोल्हापूर/सांगली : गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून त्यांच्या हस्ते विंध्यगिरी पर्वतावर रोप वे आणि रुग्णालयाचे उद्घाटन होेणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रविवारी (दि. १८), तर २५ फेब्रुवारी रोजी होणाºया समारोपासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती महास्वामी यांनी बुधवारी श्रवणबेळगोळ येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.
चारूकीर्ती महास्वामी म्हणाले, विंध्यगिरी पर्वताच्या परिसरात उद्या शुक्रवारी मोठी शोभायात्रा निघणार असून, त्याची संपूर्ण तयारी झाली आहे. साधारण पाच किलोमीटरपर्यंत ही शोभायात्रा असेल. त्यामध्ये २४ तीर्थंकरांची पालखी, सहा शास्त्र ग्रंथ, सोने, चांदीचा मुलामा दिलेले आठ रथ, चित्ररथ, १०८ तुतारी वादक, २०० बँड असतील.
पर्यावरणावर भर
महामस्तकाभिषेक महोत्सवात स्वच्छतेचा नाराही निनादला आहे. दररोज महोत्सव परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी दोन हजारहून अधिक स्वयंसेवकांनी घेतली आहे. यंदाचा मस्तकाभिषेक पर्यावरणपूरक करण्यावर समितीनेही भर दिला आहे. श्रवणबेळगोळमधील रस्त्यापासून तेभोजनगृहापर्यंत स्वच्छता दिसून येते. त्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दर्जाच्या ३० अधिकाºयांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.