शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

पुण्यात ‘घोडा’बाजार तेजीत

By admin | Updated: August 8, 2016 01:32 IST

एक संगणक अभियंता स्वत:च्या पत्नीचा खून करण्यासाठी चक्क बेकायदा पिस्तूल वापरतो, ही घटना पोलिसांना हादरवून गेली आहे.

पुणे : एक संगणक अभियंता स्वत:च्या पत्नीचा खून करण्यासाठी चक्क बेकायदा पिस्तूल वापरतो, ही घटना पोलिसांना हादरवून गेली आहे. एरवी गुन्हेगारांच्या हातामध्ये दिसणारी बेकायदा पिस्तूल आणि गावठी कट्ट्यांचा वापर उच्चशिक्षितांकडून होऊ लागल्यामुळे या बेकायदा शस्त्रांच्या तस्करीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांनी पोलिसांना ही तस्करी मोडून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यात फोफावत चाललेला हा ‘घोडा’बाजार सध्या तरी तेजीत असल्याचे चित्र आहे. मागील काही वर्षांपासून बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून शेकडो बेकायदा पिस्तूल पुण्यामध्ये येऊ लागली आहेत. पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये केलेल्या विविध कारवायांमध्ये ७० पिस्तूल आणि १३८ काडतुसे जप्त केली आहेत. यामध्ये ७७ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या घटना चिंताजनक आहेतच, परंतु भविष्यातील संकटाची चाहूल देणाऱ्या आहेत. पोलिसांनीही गुन्हेगारांच्या गोळीला गोळीनेच प्रत्युतर देत गेल्या २८ वर्षांत विविध चकमकींमध्ये २७ गुन्हेगारांचा खात्मा केलेला आहे. गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा पिस्तुलांचा वापर सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पुणे शहर आणि जिल्ह्यामधील गुन्हेगारांनी मुंबईतील टोळ्यांकडून शस्त्रे आणायला सुरुवात केली. कालांतराने थेट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये संधान साधत शस्त्रांची तस्करी सुरू झाली. या राज्यांमधल्या बेकायदा शस्त्र निर्मात्यांनी महाराष्ट्रात त्यांचे तस्कर नेमले. शहरी आणि ग्रामीण भागातील किशोरवयीनांपासून ते लँडमाफिया, बांधकाम व्यावसायिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही कार्यकर्तेही या शस्त्रांच्या प्रेमात पडलेले आहेत. ‘भाई’ होण्याची खुमखुमी, पैशांचा हव्यास आणी मानसिक ताणतणाव यामुळे या शस्त्रांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. (प्रतिनिधी)कशी येतातही शस्त्रे राज्यात?रेल्वे, खासगी वाहने आणि प्रवासी बसेसमधून ही शस्त्रास्त्रे शहरामध्ये आणण्यात येतात. त्यांच्यावर कुठेही पोलिसांचा ‘चेक’ नसतो. पुण्यामधून थेट उत्तर भारतामध्ये जाऊन तेथून मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करून आणली जातात. ही वाहने कोठेही तपासली जात नाहीत. विशेषत: प्रवासी बसेस, रेल्वे गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यांची कोठेही तपासणी होत नसल्याचा फायदा शस्त्रतस्करांना होत आहे.