शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सुट्ट्यांच्या हंगामात ‘कोरोना’ची दहशत; अनेकांनी सहली होताहेत रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 12:19 IST

Coronavirus : पुण्यातून चीन, अन्य आशियाई देश, युरोपसह अन्य देशांमध्ये सहलीसाठी जाणाऱ्यांमध्ये धास्ती

ठळक मुद्दे सहली अचानक रद्द केल्यास त्याचा परतावा मिळण्यात अडचणीमार्च, एप्रिल, मे या कालावधीत शाळा-महाविद्यालयांना सुट्टया

पुणे : कोरोना विषाणूने अनेक देशांना विळखा घातला असल्याने जगभरातील पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. पुण्यातून चीन, अन्य आशियाई देश, युरोपसह अन्य देशांमध्ये सहलीसाठी जाणाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. त्यामुळे काहींनी नियोजित सहली रद्द केल्या असून अनेक जण ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या भुमिकेत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे २० ते ५० टक्क्यांपर्यंची बुकिंग रद्द झाल्याचे टॅव्हल एजंट व कंपन्यांकडून सांगण्यात आले.चीनमधून सुरूवात झालेल्या कोरोना विषाणूने बाधित झालेले २९ रुग्ण देशात आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे  वातावरण आहे. त्याचा फटका पर्यटनालाही बसू लागला आहे.

मार्च, एप्रिल, मे या कालावधीत शाळा-महाविद्यालयांना सुट्टया असल्याने अनेक जण परदेशी सहलींचे नियोजन करतात. त्यासाठीचे बुकिंग डिसेंबर महिन्यापासूनच सुरू होते. त्यानुसार चीनसह, नेपाळ, भुतान, जपान, श्रीलंका तसेच अन्य आशियाई देश, युरोप, ऑस्ट्रेलिया आदी देशांना अधिक पसंती दिली जाते. पण यंदा कोरोनामुळे पर्यटकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून नियोजित सहली रद्द करण्याकडे कल वाढू लागला आहे.

...............

५० ते ६० टक्के बुकिंग केले रद्दहे प्रमाण जवळपास २० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. तर अनेक जण कोरोनाचा प्रसार एप्रिल-मेपर्यंत थांबेल, या आशेवर आहेत. आपल्याकडील सर्व बुकिंग रद्द झाल्याची माहिती एका ‘ट्रॅव्हल एंजट’ने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच इतरांकडील ५० ते ६० टक्के बुकिंग रद्द झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

..............................

‘कोरोनाच्या भीतीमुळे ७ ते ८ आंतरराष्ट्रीय सहली रद्द झाल्या आहेत. तसेच आणखी काही रद्द होऊ शकतात. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन नुकताच हा व्यवसाय सुरू केला होता. पण आता खूप नुकसान सहन करावे लागत आहे,’ असे कीन ट्रॅव्हल्सचे संचालक सी. के. गौरव यांनी सांगितले..........पर्यटकांमध्ये कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. भीतीपोटी नियोजित सहली रद्द केल्या जात आहेत. तर, एप्रिल व मे महिन्यांत सहली असलेले अनेक जण कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची वाट पाहत आहेत. आम्ही कोणत्याही पर्यटकांवर सहल रद्द न करण्याबाबत जबरदस्ती करत नाही; पण त्यांना थांबण्याचा सल्ला देत आहोत. सहल रद्द केल्यास पर्यटकांसह आमचेही आर्थिक नुकसान होत आहे. सहलींसाठी परदेशामध्ये हॉटेल किंवा इतर सुविधा आधीच बुक कराव्या लागतात. अचानक रद्द केल्यास त्याचा परतावा मिळण्यात अडचणी येत आहेत. पर्यटकांनी घाबरून न जाता थोडी प्रतीक्षा करावी.- नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे.........लोकांच्या मनामध्ये कोरोनाची भीती आहे. सध्या २० ते ३० टक्के नियोजित सहली रद्द झाल्या आहेत; पण प्रत्यक्षात अनेक देशांमधील पर्यटन सुरू आहे. आम्ही दोन दिवसांपूर्वीच न्यूझीलंडहून एका ग्रुपला घेऊन आलो. त्यांना कोणतीही अडचण आली नाही.  - विवेक गोळे, संचालक, भाग्यश्री ट्रॅव्हल्स...........कोरोनामुळे लोक नियोजित सहलींविषयी सातत्याने विचारणा करीत आहेत. आम्ही त्यांना सध्यातरी थांबण्याचा सल्ला देत आहोत. उन्हाळ्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे नियोजित सहली रद्द न करण्याचे सांगत आहेत. सध्या जरी सहली रद्द होत नसल्या तरी लोक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. - विनायक वाकचौरे, बिझनेस मॅनेजर, गिरीकंद हॉलीडेज्..........

 

टॅग्स :corona virusकोरोनाtourismपर्यटनTravel Tipsट्रॅव्हल टिप्सPuneपुणे