शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांसोबत विमानात नेमके कोण होते? अपघातातून कोणालाही वाचवता आले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:12 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला.

Ajit Pawar Plane Crash: राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीच्या दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार भव्य सभांचे आयोजन करण्यात आले होते. या नियोजित दौऱ्यासाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. मात्र, विमानतळावर उतरत असताना लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ही दुर्घटना घडली. विमान कोसळताच त्याने पेट घेतल्याने ते संपूर्ण जळून खाक झाले. 

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेदिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारामती येथे झालेल्या विमानाचा अपघात अत्यंत भीषण होता. या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ५ व्यक्ती होत्या. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे एक पी.एस.ओ. आणि एक सहाय्यक प्रवास करत होते. विमानाचे नियंत्रण करण्यासाठी दोन क्रू मेंबर्स, ज्यात मुख्य पायलट आणि सह-पायलट  यांचा समावेश होता. डीजीसीएने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण क्रॅश लँडिंगमध्ये विमानातील कोणीही वाचू शकलेले नाही. विमानातील पाचही जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक अशी मृतांची नावे आहेत.

राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवार यांच्यासारख्या ताकदीच्या नेत्याचा अशा अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes: Ajit Pawar, Five Others Dead in Plane Crash

Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar and five others died in a devastating plane crash during landing in Baramati. The aircraft caught fire, leaving no survivors. The incident occurred as Pawar was arriving for election rallies, plunging Maharashtra into mourning and creating political turmoil.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटना