कर्तृत्ववान पोलिसांचा सन्मान

By Admin | Updated: February 22, 2016 02:20 IST2016-02-22T02:20:15+5:302016-02-22T02:20:15+5:30

उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीसपदक घोषित करण्यात आलेल्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सन्मानित करण्याला राज्य सरकारला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे

Honorable police officer | कर्तृत्ववान पोलिसांचा सन्मान

कर्तृत्ववान पोलिसांचा सन्मान

मुंबई : उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीसपदक घोषित करण्यात आलेल्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सन्मानित करण्याला राज्य सरकारला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या ८० हून अधिक शौर्यवान पोलीस अधिकाऱ्यांचा सोमवारी राज्यापाल सी.विद्यासागर यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये सायंकाळी साडेचार वाजता हा सोहळा रंगणार आहे.
सीआयडीचे प्रमुख संजयकुमार, तुरुंग विभागाचे महानिरीक्षक डॉ.भूषणकुमार उपाध्याय, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले सदानंद दाते आदी अधिकाऱ्यांचा या सोहळ््यात सन्मान होणार आहे. सोमवारी होणाऱ्या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित व गृहविभागातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Honorable police officer