शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

मा.लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

By admin | Updated: August 1, 2016 15:21 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची आज (१ ऑगस्ट) पुण्यतिथी

संजीव वेलणकर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ -  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची आज (१ ऑगस्ट) पुण्यतिथी
 २३ जुलै १८५६ चिखली येथे त्यांचा जन्म  झाला. 
 
शेंगांची गोष्ट
ते शाळेत असतांनाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. हा कचरा पाहून अपेक्षेप्रमाणे शिक्षक रागावले आणि कचरा करणार्यांरची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी पूर्ण वर्गाला शिक्षा देण्याचे ठरवले. पण टिळकांनी हात पुढे करण्यास नकार दिला. ते म्हणाले, "मी कचरा केला नाही आणि म्हणून तुम्ही मला मारू शकत नाही." तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणार्याा मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.
 
मा.टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र या विषयांचे मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके 'ओरायन' (Orion) आणि 'आर्क्टिक होम ऑफ वेदाज' (Arctic home of vedas) त्यांच्या, अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नाविन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक 'गीतारहस्य' यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे.
 
त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह - 
    * The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
    * वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)
    * टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
    * टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
    * Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केलेले.
मा.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.
लोकमत समूहातर्फे मा.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना आदरांजली.