हनीसिंगला पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश

By Admin | Updated: January 9, 2015 01:48 IST2015-01-09T01:48:53+5:302015-01-09T01:48:53+5:30

पंजाबी गायक यो यो हनीसिंगला जबाब देण्यासाठी १३ जानेवारी रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी दिले.

Honey Singh's command to be present in the police station | हनीसिंगला पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश

हनीसिंगला पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश

नागपूर : पंजाबी गायक यो यो हनीसिंगला जबाब देण्यासाठी १३ जानेवारी रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी दिले.
हनीसिंगने अटकपूर्व जामिनासाठी, तर तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी हनीसिंगला अटकपूर्व जामीन देऊ नये, यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दोन्ही अर्जांवर गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकूण घेत न्या़ आझमी यांनी हनीसिंगला पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले. हनीसिंगला सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. हा आदेश पुढील तारखेपर्यंत लागू राहणार आहे.
जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हनीसिंगच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत असल्याचे जब्बल यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Honey Singh's command to be present in the police station